खुशखबर! मुंबईतील 217 घरांसाठी म्हाडाची 2 जूनला निघणार लॉटरी

खुशखबर! मुंबईतील 217 घरांसाठी म्हाडाची 2 जूनला निघणार लॉटरी

हक्काच्या घराचं स्वप्न पाहणाऱ्या मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी.

  • Share this:

मुंबई, 28 मे : हक्काच्या घराचं स्वप्न पाहणाऱ्या मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी. म्हाडाच्या घरांची लॉटरी येत्या 2 जून रोजी निघणार आहे. मुंबईत म्हाडातर्फे 217 घरांची लॉटरी काढण्यात येणार आहे. म्हाडाच्या घरांसाठी एकूण 66,078 अर्ज प्राप्त झाले होते. म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत 78,773 जणांनी अर्ज दाखल केले. यातील पात्र ठरलेल्या अर्जदारांची नावं 30 मे रोजी  म्हाडाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे. यानंतर  2 जून रोजी म्हाडा भवनामध्येच लॉटरी काढण्यात येणार आहे.

पाहा : VIDEO: पायल तडवी आत्महत्या प्रकरण; खासदार सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया

येथील घरांसाठी निघणार लॉटरी

अल्प उत्पन्न गट -  170 घरे

चेंबूरमधील शेल टॉवर :  इमारत क्रमांक 2, 23, 37 मध्ये 170 घरे

मध्यम उत्पन्न गट - एक घर

चेंबूरमधील सहकारनगर : घराची किंमत 39 लाख 64 हजार रुपये

पवई - 46 घरे

घरांची किंमत 55 लाख 61 हजार  रुपये

पाहा :

VIDEO: दमदार विजयानंतर वडिलांच्या भाजप प्रवेशाबाबत काय बोलले सुजय विखे?

First published: May 28, 2019, 5:39 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading