पहाडी गोरेगाव भागात म्हाडा बांधणार तब्बल 5 हजार घरे, म्हाडाचा आजवरचा सर्वातमोठा प्रकल्प

मुंबईकरांना परवडणाऱ्या घरं देणाऱ्या म्हाडाकडून लवकरच सुमारे पाच हजार घरांसाठी निविदा काढली जाणार आहे. गेल्या कित्येक वर्षात म्हाडानं एकावेळी इतकी घरं बांधण्यासाठी एकत्रित निविदा काढली नव्हती. पण गोरेगाव भागातील एक मोठा भूखंड मोठी कायदेशीर लढाई जिंकल्यानंतर म्हाडाला प्राप्त झाला आहे. त्याजागेवर ही ५००० घरं बांधण्यासाठी याच आठवड्यात ननिविदा काढली जाणार आहे. गोरेगाव पहाडी भागात हा 18 एकरांचा भूखंड आहे.

Chandrakant Funde | News18 Lokmat | Updated On: Nov 22, 2017 11:13 PM IST

पहाडी गोरेगाव भागात म्हाडा बांधणार तब्बल 5 हजार घरे, म्हाडाचा आजवरचा सर्वातमोठा प्रकल्प

22 नोव्हेंबर, मुंबई : मुंबईकरांना परवडणाऱ्या घरं देणाऱ्या म्हाडाकडून लवकरच सुमारे पाच हजार घरांसाठी निविदा काढली जाणार आहे. गेल्या कित्येक वर्षात म्हाडानं एकावेळी इतकी घरं बांधण्यासाठी एकत्रित निविदा काढली नव्हती. पण गोरेगाव भागातील एक मोठा भूखंड मोठी कायदेशीर लढाई जिंकल्यानंतर म्हाडाला प्राप्त झाला आहे. त्याजागेवर ही ५००० घरं बांधण्यासाठी याच आठवड्यात ननिविदा काढली जाणार आहे. गोरेगाव पहाडी भागात हा 18 एकरांचा भूखंड आहे.

पहाडी गोरेगाव, बांगूर नगर, गोरेगाव पश्चिम येथील सुमारे १८ एकर परिसरात उभारण्यात येणारा हा गृहप्रकल्प 'अ' आणि 'ब' अशा दोन भूखंडात विभागण्यात आला आहे. सुमारे ४१,६१४ चौरस मीटर व्याप्ती असलेल्या भूखंड 'अ' वर अंदाजे २,९५० सदनिका उभारण्यात येतील. यापैकी १,६६५ सदनिका अत्यल्प उत्पन्न गटासाठी, ५५५ सदनिका अल्प उत्पन्न गटासाठी, ४१७ सदनिका मध्यम उत्पन्न गटासाठी, ३१३ सदनिका उच्च उत्पन्न गटासाठी बांधण्यात येणार आहेत. तर २९,७४० चौरस मीटर व्याप्ती असलेल्या भूखंड 'ब' वर अंदाजे २,१०९ सदनिका उभारण्यात येणार आहेत. यापैकी १,१९० सदनिका अत्यल्प उत्पन्न गटासाठी, ३९७ सदनिका अल्प उत्पन्न गटासाठी, २९८ सदनिका मध्यम उत्पन्न गटासाठी, २२४ सदनिका उच्च उत्पन्न गटासाठी बांधण्यात येणार आहेत.

भूखंडासाठी म्हाडाने लढली 25 वर्षे न्यायालयीन लढाई !

सुमारे पंचवीस वर्षांपासून म्हाडाच्या नावे असलेली ही २५ एकर जमीन न्यायालयीन प्रक्रियेमध्ये अडकली होती. ही जमीन शासनाने ५० वर्षांपूर्वी गायरान जमीन म्हणून देण्यात आल्याचे सांगून कुसुम शिंदे नामक महिलेने या जागेवर आपला हक्क असल्याचा दावा न्यायालयात दाखल केला होता. प्रत्यक्षात मात्र. हा भूखंड शासनाने म्हाडासाठी राखीव केला होता. तरीही, या महिलेने हा भूखंड परस्पर एका बिल्डरला विकला आणि बक्कळ पैसा कमावला होता. शासकीय भूखंडाच्या या बेकायदेशीर विक्री विरोधात म्हाडाने शहर दिवाणी न्यायालय ते सर्वोच्च न्यायालय असा प्रवास तब्बल पंचवीस वर्षे न्यायालयीन लढाई लढली. मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने कुसूम शिंदे आणि विकासक यांचे जमिनीवरील हक्क सांगण्याकरिता केलेले सर्व दावे फेटाळून लावले. याशिवाय सरकारी जमीन हडप करण्याचा प्रयत्न केला म्हणून एक कोटी रुपयांचा दंडही ठोठावला. अशा प्रकारे हा खटला म्हाडासाठी एक ऐतिहासिक उपलब्धी ठरलाय. गोरेगाव लिंक रोड वरील अत्यंत मोक्याच्या ठिकाणी असलेल्या या भूखंडावरील अतिक्रमण रोखण्यासाठी म्हाडाच्या अभियंत्यांनी प्रयत्नांची मोठी शिकस्त केली होती. येत्या तीन वर्षात हा 5 हजार घरांचा गृहप्रकल्प पूर्ण होणार आहे. त्यासाठी पुढच्या आठवड्यात म्हाडातर्फे रिसतर निविदाही काढल्या जाणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 22, 2017 11:13 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...