ग्राहकाची सटकली, लाखमोलाची MG Hector गाढवाला जुंपली!

ग्राहकाची सटकली, लाखमोलाची MG Hector गाढवाला जुंपली!

मॉरिस गॅरेज इंडिया म्हणजे एमजी मोटरला एका ग्राहकाने चांगलाच हिस्का दाखवला आहे. भारताच्या रस्त्यावर एमजी मोटरची MG Hector ही एकमेव कार धावत आहे.

  • Share this:

उदयपूर, 11 डिसेंबर : मॉरिस गॅरेज इंडिया म्हणजे एमजी मोटरला एका ग्राहकाने चांगलाच हिस्का दाखवला आहे. भारताच्या रस्त्यावर एमजी मोटरची MG Hector ही एकमेव कार धावत आहे. पण, एका ग्राहकाने या कारबद्दल प्रचंड संताप व्यक्त केला आहे. या ग्राहकाने महागडी MG Hector कार थेट गाढवाला जुंपली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

घडलेली हकीकत अशी की, उदयपूर इथं राहणारे विशाल पंचोली यांनी MG Hector ही कार खरेदी केली. पण काही दिवसांमध्ये या कारमध्ये तांत्रिक बिघाड झाला. याबद्दल त्याने एमजी मोटरच्या सर्व्हिस सेंटरकडे तक्रार केली. कारच्या कल्च प्लेटमध्ये बिघाड झाल्याचं समोर आलं. यावर कंपनीचं म्हणणं होतं की, दुसऱ्या गिअरवर गाडी चालवली म्हणून हा बिघाड आला.

कारमध्ये दुरस्ती केल्यानंतर अवघ्या 150 किमी चालवल्यानंतर पुन्हा एकदा हाच बिघाड झाला आणि गाडी ब्रेकडाऊन झाली. त्यामुळे पुन्हा जेव्हा कंपनीकडे तक्रार केली असता त्यांची दखल घेण्यात आली नाही. उलट सर्व्हिस सेंटरवर कंपनीचे कर्मचाऱ्यांनी हुज्जत घातली, असा आरोप पंचोलींनी केला. हे प्रकरण इतक विकोपाला गेलं की, पोलिसांमध्ये तक्रार करण्यात आली.

कंपनीच्या या भूमिकेच्याविरोधात पंचोली यांनी आक्रमक पवित्रा घेतला. त्यांनी मोठं मोठाले पोस्टर छापून कारवर दोन्ही बाजूने लावली. या पोस्टरमध्ये 'गाढवाची गाडी, कृपया एमजी हेक्टर गाडी खरेदी करू नका' असं म्हणून लोकांना आवाहन केलं आहे. एवढंच नाहीतर कार एका गाढवाने जुंपली.

या व्हिडिओनंतर कंपनीने यावर खुलासा केला आहे. आम्ही ग्राहकाला पूर्ण सर्व्हिस दिली होती. रिप्लेसमेंट आणि रिटर्न स्किमच्याआधीच पंचोली यांनी कंपनीची प्रतिमा खराब केली, असा आरोप कंपनीने केला. तसंच ग्राहकाच्या विरोधात कारवाई करण्याचे संकेतही दिले होते.

परंतु, सोशल मीडियावर लोकांनी एमजी मोटरवर सडकून टीका केली. एवढंच नाहीतर लोकांनी एमजी मोटर कंपनीलाच याबद्दल जाब विचारला. अखेर एमजी मोटर इंडियाचे व्यवस्थापक राजीव चाबा यांनी ट्विट करून पंचोली यांची कारची दुरुस्ती करण्यात आली आहे. तरीही ते संतुष्ट नाही. आम्ही 100 टक्के रिटर्न आणि रिप्लेसमेंटची ऑफर दिली होती. पण त्यांनी नकार दिला. आता आम्ही काय करावं? असा सवाल उपस्थितीत केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 11, 2019 10:31 PM IST

ताज्या बातम्या