बंगळुरु, 27 ऑगस्ट : देशभरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आज देशांची रुग्णसंख्या मोठ्या संख्येने वाढल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. काही राज्ये अनलॉकच्या अंतर्गत अनेक सेवा सुरू करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यातच कर्नाटकात गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आणण्यात काही प्रमाणात यश आलं आहे. त्यामुळे बंगळुरुतील मेट्रो सेवा लवकरच पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. सार्वजनिक सेवा स्थिरस्थावर होत असल्याने हळूहळू मेट्रो सेवा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.ए. येडियुरप्पा यांनी सांगितले.
Metro services in Bengaluru will be restarted soon as normalcy is slowly being restored in public life: Karnataka Chief Minister B S Yediyurappa
— Press Trust of India (@PTI_News) August 27, 2020
बंगळुरुत परिस्थितीत स्थिर होत असल्याने मेट्रो सेवा पुन्हा करण्यात येणार असल्याचे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले. पीटीआयने यासंदर्भात ट्विट केलं आहे.
हे वाचा-100mgचे दोन डोस ठरणार कोरोना रुग्णांसाठी संजीवनी, ट्रायलमधून आली आनंदाची बातमी
गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या संख्येनं वाढ होत आहे. गेल्या 24 तासांत तब्बल 75 हजार 760 नवीन रुग्णांची नोंद झाली. तर, एकाच दिवसात सर्वाधिक 1023 रुग्णांचा मृत्यू झाला. याआधी भारतात 22 ऑगस्ट रोजी सर्वाधिक 69 हजार 878 रुग्णांची नोंद झाली आहे. पहिल्यांदाच देशातील कोरोना रुग्णांची संख्या 75 हजार पार झाली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात सध्या 7 लाख 25 हजार 99 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर, 25 लाख 23 हजार 772 रुग्ण निरोगी झाले आहेत. तर, 60 हजार 472 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.