मीरा भाईंदरकरांना मेट्रो भेट

मीरा भाईंदरकरांना मेट्रो भेट

  • Share this:

स्वाती लोखंडे-ढोके, मुंबई

30 मार्च : एमएमआरडीएच्या बजेटमध्ये नुकतंच ६ हजार ५१८ कोटींच्या प्रकपाला मान्यता मिळाली. विशेष म्हणजे इतर मेट्रो जाळ्याशी ही मेट्रो जोडली जाणार असल्यानं मुंबईतील पश्चिम आणि पूर्व उपनगरात प्रवास करणं मीरा-भाईंदरकरांना सोपं जाणार आहे.

मुंबईच्या वेशीवर असणाऱ्या मीरा भाईंदरलाही आता त्यांची स्वत:ची मेट्रो आता मिळणार आहे. दहिसर पूर्व ते मीरा-भाईंदर असा या मेट्रो ९ चा मार्ग असेल. आणि ती मेट्रो ७ म्हणजेच दहिसर पूर्व ते एअरपोर्ट, तसंच दहिसर ते अंधेरी पश्चिम डी एन नगर यांच्याशी जोडली जाणार आहे.

एकूण १३ किमीच्या या मार्गावर ११ स्टेशन्स असतील. पैकी १० स्टेशन हे उन्नत म्हणजेच अंधेरी घाटकोपर या मेट्रोसारखे असतील. ६५१८ कोटींच्या मेट्रोला बुधवारी झालेल्या एमएमआरडीएच्या अर्थसंकल्पीय बैठकीत मंजुरी देण्यात आली. आणि १०० कोटींची तरतूदही करण्यात आली.

मीरा भाईंदरला ट्रेनमध्ये चढणं म्हणजे जीवावर उदार होऊनच प्रवास केल्यासारखं आहे. विरारहुन आधीच गर्दीने तुडुंब भरलेल्या ट्रेन मीरा भाईंदरला येतात तेव्हा मात्र त्या ट्रेनमद्ये चढणंच तारेवरची कसरत असते.

स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मीरा भाईंदरला ट्रेनने प्रवास केला होता म्हणे. एमएमआरडीएनं जरी मंजुरी दिली तरी अजुनही कॅबिनेटची मंजुरी मिळणं गरजेच आहे. कॅबिनेटच्या मंजुरीनंतर मग टेंडर काढले जातील. येत्या ३ वर्षात ही मेट्रो सुरू करण्याचा एमएमआरडीएचा मानस आहे.

First published: March 30, 2017, 10:57 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading