मोदींच्या मंत्रिमंडळातील या मंत्र्याची खुर्ची धोक्यात? पंतप्रधानांकडे सगळ्यांचं लक्ष

मोदींच्या मंत्रिमंडळातील या मंत्र्याची खुर्ची धोक्यात? पंतप्रधानांकडे सगळ्यांचं लक्ष

विरोधी पक्षांपाठोपाठ मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेनेही अकबर यांच्या राजीनाम्याची मागणी केलीय. त्यामुळं पंतप्रधान कुठला निर्णय घेतात याकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलंय.

  • Share this:

नवी दिल्ली, ता. 11 ऑक्टोबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातले महत्वाचे मंत्री एम.जे. अकबर यांच्यावर लैंगिक गैरवर्तनाचे आरोप होताहेत. या आरोपांमुळं त्यांच्या राजीनाम्यासाठी सरकारवर दबाव वाढतोय. काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांपाठोपाठ आता मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेनेही अकबर यांच्या राजीनाम्याची मागणी केलीय. त्यामुळं पंतप्रधान अकबर यांच्याबाबत कुठला निर्णय घेतात याकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलंय.

परराष्ट्र राज्यमंत्री अकबर हे सध्या विदेश दौऱ्यावर आहेत. त्यामुळं ते परत आल्यानंतरच त्यांच्याबाबत पंतप्रधान निर्णय घेतील असा अंदाज विश्वसनीय सूत्रांनी व्यक्त केला. अकबर यांना राजीनामा देण्यास सांगतलं जावू शकतं असाही अंदाज व्यक्त होतोय. तातडीनं काही निर्णय घेतल्यास त्याचा भारताच्या प्रतिमेवर परिणाम होऊ शकतो त्यामुळं अकबर विदेश दौऱ्यावर असेपर्यंत निर्णय घेतला जाणार नाही.

#MeToo या मोहिमेत अकबर यांच्यावर तब्बल सहा महिला पत्रकारांनी लैंगिक गैरवर्तनाचे आरोप केले होते. आरोप करणाऱ्या सर्व पत्रकार या प्रतिष्ठीत वृत्तपत्रांमध्ये काम करणाऱ्या आहेत. अकबर हे संपादक असतानाच्या त्या सर्व घटना आहेत. चौफेर दबाव वाढत असताना अकबर यांना पदावर ठेवणं हे सरकारला परवडणारं नाही.

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अशा कलंकित मत्र्याला पदावर ठेवणं सरकारला महागात पडू शकते. त्यामुळं सरकारला निर्णय घेणं भाग आहे असा अंदाज राजकीय निरिक्षकांनी व्यक्त केलाय.

अकबर हे 'द टेलिग्राफ', 'एशियन एज' आणि 'द संडे गार्डियन' या वृत्तपत्रांचे संपादक होते. सध्या ते भाजपचे राज्यसभेचे खासदार आहेत. संपादक असतानाच्या कार्यकाळात नोकरीच्या मुलाखतीसाठी गेलेल्या आणि त्यांच्या काही महिला सहकाऱ्यांनीच त्यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप केले आहेत.

हॉटेलच्या खोलीत बोलावून अश्लिल संभाषण करणं, मद्य पिण्यासाठी आग्रह करणं, आक्षेपार्ह शेरेबाजी करणं असे अनेक आरोप एम.जे. अकबर यांच्यावर लावण्यात आले आहेत.

'असे बरेच प्रश्न आहेत' बलात्काराच्या प्रश्नावर गिरीष बापटांची उडवाउडवी

First published: October 11, 2018, 4:57 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading