‘मेट गाला’मध्ये एका मिठीसाठी बहिणीने घातला राडा, दीपिका म्हणाली...

‘मेट गाला’मध्ये एका मिठीसाठी बहिणीने घातला राडा, दीपिका म्हणाली...

या सगळ्यात दीपिकाला मेट गालामध्ये तिची एक अतरंगी चाहतीही भेटली.

  • Share this:

नवी दिल्ली, 8 मे- मेट गालामध्ये प्रियांका चोप्रा आणि दीपिका पदुकोणच्याच नावाची चर्चा होती. प्रियांका आणि दीपिका दोघांचेही वेगवेगळे फोटो सोशल मीडियावर दिवसभर ट्रेण्ड होत होते. या सगळ्यात दीपिकाला मेट गालामध्ये तिची एक अतरंगी चाहतीही भेटली. ही चाहती म्हणजे प्रसिद्ध यूट्यूबर सुपरवूमन लिली सिंह. लिलीला दीपिकाला कोणत्याही परिस्थितीत एकदा भेटायचेच होते. त्यामुळे ती वाट्टेल ते करण्याची तिची तयारी होती.

दीपिकापर्यंत पोहचणं तसं सोप्पं नव्हतं म्हणून लिलीने एक दोन नव्हते अनेक अडथळे पार करत दीपिकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. आपल्या या अनुभवाबद्दल सोशल मीडियावर लिहिताना सुपरवूमन लिलीने लिहिलं की, ‘संपूर्ण मेट गाला पालथा घातला, घातलेल्या या जड ड्रेसमुळे सहा खुर्च्यांना आदळले, १६ लोकांनी तर ड्रेसवर पायही ठेवला आणि दीपिका पदुकोण या माझ्या बहिणीला एकदा मिठी मारण्यासाठी पायात गोळेही आले. पण एका मिठीसाठी हे काहीच नाही.’ तिच्या या ट्वीटला दीपिकानेही उत्तर दिलं. रिट्वीट करत दीपिका म्हणाली की, पुढच्या वेळी एवढं सगळं करण्यापेक्षा एक फोन कर... ते जास्त सोपं असेल.

‘मोदी तुम्ही तर पूर्णपणे मनातून उतरलात’, ट्वीटनंतर अभिनेता प्रियदर्शन जाधव झाला ट्रोल

…म्हणून पहाटे 3 वाजेपर्यंत सलमान ऐश्वर्या रायचा दरवाजा वाजवत होता

11 वेळा आनंद आणि सोनमने दाखवून दिले काय असतात ‘कपल गोल्स’

लिली सिंह ही स्वतः सोशल मीडियाची क्विन आहे. तिचे अनेक फॉलोवर्स असून जगभरात तिचे व्हिडीओ पाहिले जातात. भारतीय वंशाची कॅनेडियन लिली ही यूट्यूब स्टार आहे. तिचं ‘सुपरवुमन’ हे चॅनल सर्वात जास्त पाहिल्या जाणाऱ्या चॅनलपैकी एक आहे. एवढंच नाही तर फोर्ब्स मासिकाने यूट्यूबवरून सर्वात जास्त कमाई करणारी महिला म्हणून तिचा गौरवही केला होता. मिशेल ओबामा, सेलेना गोमेजपासून माधुरी दीक्षित, शाहरुख खानपर्यंत अनेक सेलिब्रिटी तिचे चाहते आहेत.

रेखाचे हे फोटो पाहून तुम्ही प्रियांका चोप्राचा मेट गालाचा लुक विसराल

SPECIAL REPORT : फॅशनच्या नावाने चांगभलं!

First published: May 8, 2019, 3:04 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading