नीरव मोदी आणि चोक्सीला भारतात आणण्याचा CBI चा 'सिक्रेट प्लान', खास विमानही तयार!

नीरव मोदी आणि चोक्सीला भारतात आणण्याचा CBI चा 'सिक्रेट प्लान', खास विमानही तयार!

या दोघांना ताब्यात घेण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाचीही मदत घेण्यात येत आहे.

  • Share this:

नवी दिल्ली 26 जानेवारी : कर्जबुडव्या मोहुल चोक्सी आणि नीर मोदी यांना भारतात आणण्यासाठी CBI आणि ED ने मिळून एक खास योजना तयार केलीय. आणीबाणीच्या परिस्थितीसाठी एअर इंडियाचं खास विमानही CBIने बुक केलं आहे. बँकांना काही हजार कोटींना चुना लावून नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी हे सध्या फरार असून विदेशात लपून बसले आहेत.

काही दिवसांपूर्वीच चोक्सीने भारताचा पासपोर्ट परत करून नीरव मोदीने एका कॅरेबियन देशाचं पैसे देऊन नागरिकत्व आणि पासपोर्ट घेतला होता. तर नीरव मोदीही याच देशांमध्ये लपून बसला असण्याची शक्यता आहे. या दोनही धेंडांना जेरबंद करण्यासाठी CBIची दोन पथकं या देशांमध्ये गेली आहेत.

या दोघांना कसं ताब्यात घेता येईल यासाठी परराष्ट्र मंत्रालयाचीही मदत घेण्यात येत असून सरकारी पाळीवर उच्चस्तरीय संपर्कही स्थापन करण्यात आला आहे. या छोट्या कॅरेबियन देशांसोबत भारताचा प्रत्यार्पण करार झालेला नाही. त्यामुळे काही अडचणी येत आहेत. त्यावरही उपाय शोधण्याचं काम सुरू आहे.

हे कॅरेबियन देश फक्त पैसे मोजून अशा लोकांना नागरिकत्व देत असतात. त्यामुळे सरकार खास काळजी घेत आहे.

First published: January 26, 2019, 9:37 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading