LOVE STORY: इंदिरा गांधींसारखीच आहे मेहबूबा मुफ्तींची प्रेम कहाणी

मेहबूबा मुफ्ती यांची प्रेम कहाणी, लग्न, कुटुंब आणि राजकारण हे सर्वच एवढं एकमेंकात गुंतलेलं आहे की शेवटी त्यांनी आयुष्यात पुढे जाण्यासाठी आपली स्वतंत्र वाट निवडली. पुढे आयुष्यात नवनवीन शिखरे गाठत राहिल्या.

Ajay Kautikwar | News18 Lokmat | Updated On: Jun 24, 2018 09:38 PM IST

LOVE STORY: इंदिरा गांधींसारखीच आहे मेहबूबा मुफ्तींची प्रेम कहाणी

श्रीनगर,ता.24 जून :मेहबूबा मुफ्ती यांची प्रेम कहाणी, लग्न, कुटुंब आणि राजकारण हे सर्वच एवढं एकमेंकात गुंतलेलं आहे की शेवटी त्यांनी आयुष्यात पुढे जाण्यासाठी आपली स्वतंत्र वाट निवडली. प्रेमभंग झाला, त्यातून कटुता वाढली आणि त्याचं रूपांतर पुढे घटस्फोटात झालं. मात्र मेहबूबा यातून सावरल्या आणि आयुष्यात नवनवीन शिखरे गाठत राहिल्या.

पुढे त्या आपल्या राज्यात सर्वात शक्तिशाली नेत्या बनल्या आणि त्या खुर्चीपर्यंत पोहोचल्या जिथे आजवर काश्मीर घाटीतली कुठलीही महिला पोहोचली नव्हती. राजकारणाच्या वाटेतही त्यांच्यासमोर बरीच आव्हाने होती. नुकतेच सरकारमधील युतीचे धागे तुटले असल्याने येणारा काळ अधिक खडतर असणार आहे.

...आणि तेव्हा पहिल्यांदा चर्चेत आल्या

1989 मध्ये छोटी बहीण रूबैया सईदचं अपहरण झाल्यानंतर मेहबूबा मुफ्ती पहिल्यांदा चर्चेत आल्या. रुबैया त्यावेळी श्रीनगरच्या हॉस्पिटलमध्ये मेडिकल इंटर्न होती. वडिल मुफ्ती मोहम्मद सईद यांना व्ही. पी. सिंग सरकारमध्ये गृहमंत्री बनून फक्त पाच दिवस झाले होते. तेव्हा मेहबूबाच मीडियाच्या सतत संपर्कात होत्या. तेव्हा त्यांचं लग्न झालेलं होतं; पण त्याकाळात त्यांना जास्त प्रसिद्धीच्या झोतात येणं आवडत नसे.

Loading...

वडिलांच्या दूरच्या नातेवाईकाशी झालं लग्न

मेहबूबा यांचं लग्न 1984 मध्ये नात्याने काका लागणाऱ्या जावेद इक्बाल शाह यांच्याशी झालं. मेहबूबा त्यावेळी एलएलबीचं शिक्षण पूर्ण करत होत्या, तर शाह यांनी नव्यानेच विद्यापीठात प्रवेश घेतला होता. यादरम्यानच दोघांचे प्रेमसंबंध जुळले. दोन वर्षांपूर्वी कोलकात्याच्या द टेलिग्राफ या इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत शाह म्हणाले की 'आमच्या प्रेमाच्या बाबतीत पहिला पुढाकार मेहबूबानेच घेतला होता. त्यांनीच मला प्रोपोज केलं होतं.' मात्र आईप्वाईस ब्लॉगस्पॉट डॉट कॉम च्या म्हणण्यानुसार ह्या लग्नासाठी मेहबूबा फारशा उत्सुक नव्हत्या.

थाटामाटात झालं लग्न

मुफ्ती मोहम्मद साहेबांना याबद्दल कळल्यावर त्यांनी आक्षेप न घेता लग्नाला होकार दिला कारण दोन्ही परिवार आधीपासूनच परस्परांच्या परिचयाचे होते. त्यांचा विवाहसुद्धा धुमधडाक्यात झाला. लग्नानंतर ते दिल्लीत स्थायिक झाले. असं म्हटलं जातं की याचदरम्यान पति-पत्नीमध्ये भांडणे होउ लागली आणि दुरावा वाढू लागला.

नात्यात दुरावा वाढू लागला

एकीकडे दोघांमधील संबंध ताणले जात होते, दुसरीकडे वडिल मुफ्ती मोहम्मद सईद आपल्या मोठ्या मुलीला राजकारणात आणण्याची तयारी करत होते. कारण मुफ्ती यांच्या मोठ्या मुलाला राजकारणात रस नव्हता. म्हणूण ते मेहबूबाच्या राजकीय प्रवेशाच्या तयारीला लागले. तर इक्बाल यांना ते पसंत नव्हते. आणि हीच बाब आगीत तेल ओतण्यास कारणीभूत ठरली. इकडे मेहबूबा राजकारणात पुढे जाऊ ल्यासगल्या आणि नात्यातील दुरावा वाढतच गेला. शेवटी त्या पतिचं घर सोडून वडिलांच्या घरी राहू लागल्या आणि नात्यात जे काही शिल्लक होतं ते ही कोर्टाच्या पायरीवर येउन संपलं.

मेहबूबा यांच्या मुली

लग्नानंतर दोघांना इर्तिका आणि इल्तिजा नावाच्या दोन मुली झाल्या. आता दोघीही मोठ्या झाल्या आहेत.

मोठी मुलगी इर्तिका लंडनस्थित भारतीय उच्च आयोगात काम करते तर दुसरी बॉलिवुडच्या फिल्म उद्योगात काम करते. मेहबूबाचे बंधू बॉलिवुडमध्ये मोठे सिनेमॅटोग्राफर आहेत.

मुलींना आईचा अभिमान

मेहबूबा पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रतिक्रिया देताना आम्हाला आईचा खूप अभिमान आहे. तिने एकटीने आम्हा दोघींचा सांभाळ केला. त्या आईला महिलांच्या रोलमॉडेल मानतात.

इक्बाल काय म्हणाले

इकबाल शाह यांनी द टेलिग्राफला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की त्यावेळी मी खूप कमी वयाचा होतो आणि आजूबाजूला घडत असलेल्या गोष्टी मी समजू शकलो नाही. हे मात्र नक्की की राजकारणामुळेच आमचे संबंध ताणले गेले. शाह आजही मुफ्ती कुटुंबावर घोर टिका करतात. घाटी प्रदेशातील खराब स्थिती, आतंकवाद आणि अस्थिरतेसाठी मुफ्ती कुटुंबलाच ते दोषी मानतात.

शाह यांनी विरोधी पक्षाच्या तिकिटावर लढवली निवडणूक

जम्मू-कश्मीरच्या मागच्या विधानसभा निवडणूकीपूर्वी 2008 मध्ये नॅशनल कॉन्फरन्सचे सदस्यही झाले होते. त्यांनी निवडणूकही लढवली मात्र पराभव झाल्यानंतर ते त्यांनी तो पक्ष सोडून राजकारणापासून दूर गेले.

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 24, 2018 09:38 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...