मेघालय, त्रिपुरा, नागालँड या ईशान्येकडील राज्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

मेघालय, त्रिपुरा, नागालँड या ईशान्येकडील राज्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

निवडणूक आयोगाने आज मेघालय, नागालँड आणि त्रिपुरा या ईशान्येकडच्या तीन राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले. त्रिपुरामध्ये 18 फेब्रुवारीला तर मेघालया आणि नागालँड या दोन राज्यात 27 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. या तिन्ही राज्यांमधील मतमोजणी 3 मार्चला होईल.

  • Share this:

18 जानेवारी, नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने आज मेघालय, नागालँड आणि त्रिपुरा या ईशान्येकडच्या तीन राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले. त्रिपुरामध्ये 18 फेब्रुवारीला तर मेघालया आणि नागालँड या दोन राज्यात 27 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. या तिन्ही राज्यांमधील मतमोजणी 3 मार्चला होईल. मुख्य निवडणूक आयुक्त ए. के. ज्योती यांनी हा निवडणूक कार्यक्रम जाहीर केलाय.

आजपासूनच या तिन्ही राज्यांमध्ये आदर्श अचारसंहिता लागू झाली आहे. मेघालय, नागालँड आणि त्रिपुरामध्ये मिळून विधानसभेच्या एकूण 60 जागा आहेत. मेघालय विधानसभेची मुदत 6 मार्च, नागालँड विधानसभेची मुदत 13 मार्च आणि त्रिपुराची विधानसभेची मुदत 14 मार्चला संपत आहे. निवडणूक आयोगाने उशिरानेच तारखा जाहीर केल्या आहेत. 2013 साली 11 जानेवारीला निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता.

मेघालयमध्ये सध्या काँग्रेसची सत्ता

मुख्यमंत्री- मुकूल संगमा (काँग्रेस)

एकूण जागा - 60

काँग्रेस (24)

यूडीपी (7)

एचएसपीडीपी (4)

भाजप (2)

राष्ट्रवादी (2)

एनपीपी (2)

एनईएसडीपी (1)

अपक्ष (9)

रिक्त जागा (9)

त्रिपुरामध्ये सध्या माकपचं सरकार

मुख्यमंत्री- माणिक सरकार (माकप)

एकूण जागा- 60

माकप (50)

भाकप (1)

विरोधी पक्ष (9)

भाजप (7)

काँग्रेस (2)

नागालँडमध्ये सध्या नागा पिपल्स फ्रंटचं सरकार

मुख्यमंत्री- टी. आर. झेलिअँग (नागा पिपल्स फ्रंट)

एकूण जागा- 60

नागा पिपल्स फ्रंट (45)

भाजप (4)

जेडी(यू) (1)

विरोधीपक्ष (9)

राष्ट्रवादी (1)

अपक्ष (8)

रिक्त जागा (1)

 

 

First Published: Jan 18, 2018 03:41 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading