Home /News /news /

मोठी बातमी, अजितदादा, पार्थ आणि काकांसोबत झाली बारामतीत बैठक

मोठी बातमी, अजितदादा, पार्थ आणि काकांसोबत झाली बारामतीत बैठक

पार्थ पवार याची नाराजी दूर करण्यासाठी शनिवारी रात्री काका श्रीनिवास पवार यांच्या घरी पार्थ पोहोचले होते.

बारामती, 16 ऑगस्ट : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपला नातू पार्थ पवार याची पक्षाविरोधात भूमिका घेतल्यामुळे चांगलीच कानउघडणी केली होती. त्यानंतर पवार कुटुंबात आणि राष्ट्रवादी पक्षात हालचालींना वेग आला होता. अखेर,  पार्थ यांची समजूत काढण्यासाठी बारामतीत पवार कुटुंबीयांची बैठक झाली. मिळालेल्या माहितीनुसार,  पार्थ पवार याची नाराजी दूर करण्यासाठी शनिवारी रात्री काका श्रीनिवास पवार यांच्या घरी पार्थ पोहोचले होते. अजित पवार यांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांच्या बंगल्यात उशिरा रात्री ही बैठक झाली. यावेळी काका श्रीनिवास पवार यांनी पार्थ यांची समजूत काढली. या बैठकीला खुद्द अजित पवार उपस्थितीत होते. तसंच अजितदादा, आई सुनेत्रा पवार, काकी शर्मिला पवार यांची संयुक्तिक चर्चा झाली. पक्षाविरोधात भूमिका घेतल्यामुळे आजोबा शरद पवार यांनी खडसावून काढल्यामुळे नाराज झालेल्या पार्थ यांची नाराजी दूर करण्यासाठी कुटुंबीयांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. काय आहे वाद? अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणी राजकीय वातावरण तापले आहे. भाजपने एकीकडे सीबीआय चौकशीची मागणी करून ठाकरे सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. तर अशात पार्थ पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन सुशांत सिंह प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी केली. पार्थ पवार यांनीच अशी मागणी केल्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात खळबळ उडाली. पार्थ पवार एवढ्यावरच थांबले नाही, तर त्यांनी राम मंदिर भूमिपूजनावर ट्वीट करून जय श्रीरामचा नारा दिला होता. पार्थ यांच्या या भूमिकेची माध्यमांचा चांगलीच चर्चा रंगली होती. त्यांच्या याच भूमिकेवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना प्रश्न विचारले असता, 'मी माझ्या नातवाच्या भूमिकेला काडीची किंमत देत नाही, तो अजून अपरिपक्व आहे' असं म्हणून पार्थ यांचे कान उपटले होते. शरद पवार यांनी जाहीरपणे आपल्या नातवाचे कान उपटल्यामुळे एकच खळबळ उडाली. त्यानंतर पार्थ नाराज असल्याची चर्चा सुरू झाली.
Published by:sachin Salve
First published:

Tags: Ajit pawar, NCP

पुढील बातम्या