मुंबई, 04 जुलै : मराठा आरक्षण संदर्भात नेमण्यात आलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची आज बैठक होत आहे. सकाळी साडे अकरा वाजता या बैठकीला सुरवात होणार आहे. मराठा आरक्षणाची सद्यस्थिती यावर समिती महाधिवक्ता मुकुंल रोहतगी यांच्यासोबत चर्चा करतील. ही बैठक व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे घेण्यात येणार आहे. 7 जुलैला सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर महत्वपूर्ण बैठक बोलवण्यात आली आहे.
उपसमितीची बैठक होत नसल्याने खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी नाराजी व्यक्त केली होती. या बैठकीला नाशिकसह राज्यातील मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारीदेखील उपस्थित असणार आहे. सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणाच्या निकालाची सुनावणी 7 जुलैला होणार आहे. याच पार्श्वभूमीवर मराठा क्रांती ठोक मोर्चा संघटना पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे. मराठा समाजानं आता 'आत्मबलिदान' आंदोलनाची घोषणा केली आहे. 23 जुलैपासून सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन करणार करण्यात येणार असल्याची माहिती मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक रमेश केरे यांनी दिली होती.
पुण्यात कोरोनाचा नाश करण्यासाठी महापौरांनी अजित पवारांकडे केल्या या मागण्या
काकासाहेब शिंदे यांच्या स्मृतिस्थळावरून आत्मबलिदान आंदोलनाला सुरूवात झाली होती. आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या 42 कुटुंबही आंदोलनात सहभागी झाले होते. मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार असल्याचा इशारा रमेश केरे यांनी दिला होता.
कोरोना हरणार देश जिंकणार! अशीच आहे पुण्याच्या या मुलीची कोव्हिड विरोधातली लढाई
अशोक चव्हाण यांनी राजीनामा द्यावा...
मराठा आरक्षण उपसमितीची बैठक अद्यापही झाली नव्हती. त्यामुळे उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी मराठी संघटनेचे मुख्य समन्वयक रमेश केरे यांनी केली होती. रमेश केरे यांनी याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे लेखी निवेदनही पाठवलं होतं. तसेच राज्य सरकारने कोर्टात आरक्षणाची बाजू मांडण्यासाठी काय तयारी केली आहे, असा सवालही रमेश केरे यांनी केला होता.
राष्ट्रवादीने ज्येष्ठ नगरसेवक गमावला, 'दत्ताकाका' यांचं कोरोनामुळे निधन
मुख्यमंत्र्यांनी मराठा आंदोलक उमेदवारांना सरकारी नोकरीमध्ये सामावून घेण्यासंदर्भात न्यायालयीन बाजू तपासून घेण्यासंदर्भात सर्वपक्षीय बैठक घेऊन निर्णय घेण्याचं आश्वासन दिले होते. आश्वासनामुळेच आझाद मैदानवरील आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आलं होतं. आझाद मैदानावर 47 दिवस आंदोलन करणाऱ्या तरुणांना नियुक्तीपत्र द्यावे, अशी मागणीबाबत लवकरात लवकर ठोस निर्णय घ्यावा, असंही रमेश केरे यांनी म्हटलं होतं.
संपादन - रेणुका धायबर मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.