मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

पाहा जगातील सर्वात कमी उंचीची आई; 3 फुटांच्या महिलेवर होतोय शुभेच्छांचा वर्षाव

पाहा जगातील सर्वात कमी उंचीची आई; 3 फुटांच्या महिलेवर होतोय शुभेच्छांचा वर्षाव

या महिलेनं आपल्या बाळाला जन्म दिला. आतापर्यंत जगात सर्वांत कमी म्हणजे 108 सेंमी उंची असलेल्या महिलेचं यशस्वी बाळंतपण झाल्याची नोंद आहे.

या महिलेनं आपल्या बाळाला जन्म दिला. आतापर्यंत जगात सर्वांत कमी म्हणजे 108 सेंमी उंची असलेल्या महिलेचं यशस्वी बाळंतपण झाल्याची नोंद आहे.

या महिलेनं आपल्या बाळाला जन्म दिला. आतापर्यंत जगात सर्वांत कमी म्हणजे 108 सेंमी उंची असलेल्या महिलेचं यशस्वी बाळंतपण झाल्याची नोंद आहे.

मुंबई 14 मे: आई होण्याचं सुख जगातील सर्वोच्च सुखापैकी एक मानलं जातं. कितीही त्रास झाला तरी आई होण्यासाठी प्रत्येक स्त्री धडपडत असते. मातृत्वाची ही ओढ काही जगावेगळी असते. याच ओढीतून जगातील सर्वात कमी उंचीच्या महिलांपैकी एक असलेल्या भारतीय महिलेनं मातृत्व प्राप्त केलं आहे. गुजरातमधील (Gujrat)दाहोद(Dahod)इथं बुधवारी अवघी 120 सेंमी म्हणजे जेमतेम 3 फूट 9 इंच उंची असलेल्या अंतरबेन डावरी(Antarben Dawari) या महिलेनं आपल्या बाळाला जन्म दिला. आतापर्यंत जगात सर्वांत कमी म्हणजे 108 सेंमी उंची असलेल्या महिलेचं यशस्वी बाळंतपण झाल्याची नोंद आहे. दैनिक भास्करडॉट कॉमनं दिलेल्या वृत्तानुसार,अतिशय कमी उंची असलेल्या अंतरबेन डावरी या 32 वर्षीय महिलेची यशस्वी प्रसूती दाहोदमधील डॉ. राहुल पडवाल(Dr. Rahul Pdawal)यांनी केली. अंतरबेनला मुलगी(Baby Girl)झाली असून तिचं वजन 2 किलो 900 ग्रॅम आहे. बाळ आणि आई सुखरूप असल्याचं डॉ. राहुल पडवाल यांनी सांगितलं. मध्यप्रदेशातील(Madhya Pradesh)अलीराजापूर जवळच्या कोलबैडा गावातील अंतरबेनला तिच्या कुटुंबीयांनी डॉ. पडवाल यांच्या रुग्णालयात दाखल केलं तेव्हा ती बेशुद्ध अवस्थेत होती. बुधवारी तिला प्रसूतीवेदना जाणवू लागल्या तेव्हा तिचे दिव्यांग पती कैलाश यांनी तिला स्थानिक रुग्णालयात नेलं;पण तिची अवस्था बघून त्यांनी तिला बडोद्याला नेण्यास सांगितलं,मात्र तेवढे दूर जाणं शक्य नसल्यानं तिला दाहोद इथं डॉ. पडवाल यांच्या रुग्णालयात आणण्यात आलं. त्यावेळी अंतरबेनची अवस्था खूपच गंभीर झाली होती. उंची कमी असण्याबरोबरच तिला कुबड असल्यानं तिच्या फुफ्फुसांवर अधिक ताण येत होता,त्यामुळं तिला श्वास घेण्यास त्रास होत होता. पाठीवरच्या कुबडामुळे भूल दिली तर तिचा परिणाम होईल की नाही याची शंका होती. अशा सगळ्या प्रतिकूल परिस्थितीतही डॉक्टर राहुल पडवाल यांनी तिच्या कुटुंबीयांना सर्व कल्पना देऊन रात्री दोन वाजता सिझेरियन करून यशस्वी प्रसूती केली. देशातील सर्वात कमी उंचीच्या एका महिलेची यशस्वी प्रसूती करण्याचे श्रेय डॉ. पडवाल यांना जाते. अंतरबेनची यशस्वी प्रसूती होऊन तब्ब्येतीनं उत्तम असलेली छानशी मुलगी झाल्यानं तिच्यासह तिचे घरचेही खूप आनंदात आहेत. अंतरबेनला त्रास होऊ लागल्यानं तिचे पती कैलाश आपलं दुकान,घर तसंच उघडं टाकून तिला रुग्णालयात घेऊन आले. या दरम्यान,त्यांच्या दुकानात चोरी झाली. मात्र मुलगी झाल्याचा आणि पत्नीही सुखरूप असल्याचा आनंद खूप मोठा असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे.
First published:

Tags: PHOTOS VIRAL, Shocking news

पुढील बातम्या