मेडिकल काॅलेजमध्येच ओली पार्टी, रुग्णवाहिकेतून आणली दारू; रशियन बॅले डान्सर्सचेही ठुमके !

मेडिकल काॅलेजमध्येच ओली पार्टी, रुग्णवाहिकेतून आणली दारू; रशियन बॅले डान्सर्सचेही ठुमके !

उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये राज्य सरकारच्या लाला लजपतराय मेडिकल कॉलेजमध्ये माजी विद्यार्थी संघटनेतर्फे कॉलेजच्या आवारात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं.

  • Share this:

26 डिसेंबर : कॉलेजच्या वार्षिक परिषदेत पाहुण्यांच्या मनोरंजनासाठी चक्क रशियन बॅले डान्सर्सना पाचारण करण्यात आलं होतं. धक्कादायक बाब म्हणजे मद्य आणण्यासाठी रुग्णवाहिकेचा वापर करण्यात आल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमधील लाला लजपतराय मेडिकल कॉलेजमध्ये घडलाय.

उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये राज्य सरकारच्या लाला लजपतराय मेडिकल कॉलेजमध्ये माजी विद्यार्थी संघटनेतर्फे कॉलेजच्या आवारात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. त्यात १९९२च्या बॅचच्या विद्यार्थ्यांना बोलावण्यात आलं होतं. सुत्रांच्या माहितीनुसार, कॉलेजच्या आवारातच उपस्थितांना दारू देण्यात आली. त्यानंतर दुपारी मनोरंजनाचा कार्यक्रम झाला. मनोरंजनाच्या कार्यक्रमाला रशियन नृत्यांगणाने बॅले डान्सचा 'तडका' दिला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर मेडिकल कॉलेजच्या प्राचार्यांनी विभागीय चौकशीचे आदेश दिले.

'या घटनेची माहिती मिळाली असून दारूचा साठा ठेवण्यासाठी संस्थेच्या किंवा खासगी रुग्णालयाच्या रुग्णवाहिकेचा वापर केला का? हे अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही. या प्रकरणी विभागीय चौकशीचे आदेश दिले आहेत,' असं प्राचार्य विनय अग्रवाल यांनी सांगितलंय.

First published: December 26, 2017, 6:49 PM IST

ताज्या बातम्या