Home /News /news /

BJP नेत्याचा फोटो वापरून सुरू केलं अॅडल्ट अकाऊंट, महिलेने मोदींकडे मागितली मदत

BJP नेत्याचा फोटो वापरून सुरू केलं अॅडल्ट अकाऊंट, महिलेने मोदींकडे मागितली मदत

फेसबुकवर फोटो वापरून त्यांच्या नावाचं फेक अकाऊंट सुरू असल्याचा आरोप भाजप नेत्याकडून करण्यात आला आहे.

    उत्तर प्रदेश, 15 मे : भाजप नेत्या आणि समाज सेविकीचा फोटो एका अॅडल्ट साईटवर शेअर केल्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. महिलेच्या नावाने खोटं फेसबुक अकाऊंट तयार करण्यात आलं आहे असा आरोपी भाजप नेत्याकडून करण्यात आला आहे. या अकाऊंटवर नॉएडाचा पत्ता आणि मोबाईल नंबर देण्यात आला आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा शोध घेत आहे. फेसबुकवर फोटो वापरून त्यांच्या नावाचं फेक अकाऊंट सुरू असल्याचा आरोप भाजप नेत्याकडून करण्यात आला आहे. त्या भाजपच्या नेत्या असून समाज सेविकादेखील आहेत. फेसबुक अकाऊंटवरून त्यांचा आणखी एक फोटो शेअर करण्यात आला असल्याचंही त्यांनी आरोपामध्ये म्हटलं आहे. या प्रकरणात महिलेने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे मदत मागितली आहे. त्याचबरोबर त्वरित कारवाई करण्याची मागणीही महिला नेत्याकडून करण्यात आली आहे. एसपी क्राईम बी.पी अशोक यांनी या प्रकरणाचा पुढील तपास सायबर सेलकडे सोपवला आहे. हेही वाचा: VIDEO : सदाभाऊ म्हणाले, 'त्या हॉटेलमध्ये फक्त आंघोळ करायला गेलो होतो' याआधी उत्तर प्रदेशच्या हापुडमधून सामुहिक बलात्काराचा अंगावर शहारे आणणारा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. न्याय मिळू शकला नाही त्यामुळे पीडित महिलेने 28 एप्रिलला घरातच स्वत:ला जाळून घेत आत्महत्या केली. त्यानंतर महिलेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये महिलेने या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली होती. या व्हिडिओमध्ये आपण विधवा असल्याचं महिेलेने सांगितलं होतं. तिच्या पतीने तिला 10 हजारांमध्ये विकलं होतं. त्यानंतर महिलेवर सामुहिक बलात्कार झाला. यासंदर्भात पीडित महिलेने पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली पण तिला न्याय मिळाला नाही. त्यानंतर अखेर तिने आत्महत्या केली. VIDEO: 'तू झक्कास दिसतेस' म्हणताच तरुणीने युवकाला चपलेनं धुतलं
    First published:

    Tags: BJP, Meerut news, Up crime news

    पुढील बातम्या