मीरा भाईंदरमधून दिलादायक बातमी, एकाच दिवशी 56 जणांनी केली कोरोनावर मात

मीरा भाईंदरमधून दिलादायक बातमी, एकाच दिवशी 56 जणांनी केली कोरोनावर मात

मीरा भाईंदरमध्ये रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं.

  • Share this:

मीरा-भाईंदर, 02 मे : मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तर मुंबईच्या उपनगरातही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे.

मीरा-भाईंदर महापालिकेच्या हद्दीमध्ये रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे परिसर रेड झोनकडे वाटचाल करीत असल्याचे वाटत असताना आज दिलासादायक वृत्त आले. आज एकाच दिवशी तब्बल  56 रुग्णांनी कोरोनावर मात केली.

मीरा भाईंदरमध्ये रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं. आतापर्यंत शहरात रुग्णांचा आकडा 157 वर पोहोचला होता. पण आता ही संख्या फक्त 57 वर येऊन ठेपली आहे. कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे.  येत्या काही दिवसांत हा आकडा कमी करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे, असा मानस पालिका आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा - लॉकडाऊनमध्ये अडवलं म्हणून पोलीस अधिकाऱ्याला फरफटत नेलं, पाहा VIDEO

सुरुवातीला कोरोना रुग्णांसाठी जागा मिळणे अशक्य असताना मीरा-भाईंदरचे आमदार गीता जैन यांनी त्यांची इमारत रुग्णांच्या उपचारासाठी खुली करून दिली होती इतकेच नव्हे तर त्यांनी पंडीत भीमसेन जोशी रुग्णालय साठी विशेष निधी मिळवून दिला.

आज मीरा भाईंदरमध्ये 56 जणांनी कोरोनावर मात केली. 14 दिवसांच्या उपचारानंतर सर्व रुग्णांची पुन्हा एकदा चाचणी घेण्यात आली. त्यानंतर सर्व रुग्णांचे रिपोर्ट हे निगेटिव्ह आले. त्यामुळे या 56 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.  राज्यात एकाच दिवशी 56 जणांनी कोरोनावर मात केल्याची राज्यातील बहुदा ही पहिलीच घटना घडली असावी.

संपादन - सचिन साळवे

Tags:
First Published: May 2, 2020 01:37 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading