उद्या देशभरातील औषध दुकानं बंद राहणार

उद्या देशभरातील औषध दुकानं बंद राहणार

ऑनलाइन औषधविक्रीवर निर्बंध आणावेत, औषध विक्रेत्यांचे कमिशन वाढवावं आणि केमिस्टवर औषधविक्रीच्या संदर्भात लावलेले नियम शिथील करावेत

  • Share this:

29 मे : ऑनलाइन औषधविक्रीवर निर्बंध आणावेत, औषध विक्रेत्यांचे कमिशन वाढवावं आणि केमिस्टवर औषधविक्रीच्या संदर्भात लावलेले नियम शिथील करावेत, या मागण्यांसाठी उद्या (मंगळवारी) देशभरातील सर्व औषध दुकानं बंद ठेवण्यात येणार आहे.

ऑल इंडिया ऑर्गनायजेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्टने हा निर्णय घेतलाय. या बंदचा फटका रुग्ण व सर्वसामान्यांना बसणार आहे. देशभरातील नऊ लाख औषध विक्रेते या संस्थेचे संघटनेचे आहेत. आमच्या तक्रारी आम्ही अनेकदा सरकारकडे मांडल्या, पण त्याचा काही उपयोग झाला नाही, म्हणूनच आम्ही बंदचा निर्णय घेतल्याचं संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय. एवढंच नाहीतर अनेक औषध विक्रेते ३0 मे रोजी दिल्लीच्या जंतर मंतरवर जमून निदर्शनंही करणार आहेत.

First published: May 29, 2017, 10:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading