या क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी येऊ शकतो मोठा निर्णय, शिक्षण मंत्र्यांची कुलगुरूंना सूचना

विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याबाबत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठानं परीक्षांचं वेळापत्रक जाहीर केलं आहे.

विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याबाबत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठानं परीक्षांचं वेळापत्रक जाहीर केलं आहे.

  • Share this:
मुंबई, 23 जुलै : राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याबाबत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठानं परीक्षांचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. मात्र, सध्याची परिस्थिती लक्षात घेता विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून वैद्यकीय परीक्षा न घेता अनुकूल वातावरण निर्माण होताच त्या घेण्यात याव्यात अशा सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांना आज दिल्या आहेत. प्रथम द्वितीय तसेच तृतीय वर्षात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पुढील वर्षीचा अभ्यासक्रम सुरू करण्यात यावा. या व अशा सर्व नॉन सर्टिफाइंग परीक्षा पुढील सूचने पर्यंत पुढे ढकलण्यात याव्यात. अंतिम वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणाला बाधा निर्माण होणार नाही. यादृष्टीने अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांची इंटर्नशिप सुरू करण्यात यावी असं अमित देशमुख यांनी म्हटलं आहे. ज्या चिमुकल्यांना 9 महिने वाढवलं त्यांचाच आवळला गळा, नंतर आईचं धक्कादायक पाऊल प्रत्येक पालकासाठी अतिशय महत्त्वाची बातमी, महाराष्ट्र सायबरनं केलं आवाहन कोविड -19 चा प्रादुर्भाव कमी होताच या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यात याव्यात आणि तसं केंद्रीय मंडळाला कळवण्यात यावं अशी मागणी यावेळी अमित देशमुख यांनी कुलगुरूंकडे केली आहे. पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी सध्या कॅम्पसमध्येच असल्यामुळे याबाबत फारशी अडचण येणार नाही. अनलॉकनंतर आता पुन्हा लॉकडाऊन होणार का? राजेश टोपेंनी दिली महत्त्वाची माहिती या विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणासाठीची प्रवेश परीक्षा 15 सप्टेंबर रोजी असल्याने विद्यार्थ्यांच्या परीक्षा ठरल्यानुसार वेळेवर घेण्यात याव्यात मात्र कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे ऐन वेळी अडचण निर्माण झाल्यास परिस्थिती पाहून याबाबत निर्णय घेण्यात यावा अशा सूचनाही वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाच्या कुलगुरूंना दिल्या आहेत.
Published by:Renuka Dhaybar
First published: