नवी दिल्ली, 10 एप्रिल : #MeToo मोहिमेतून ज्येष्ठ पत्रकार आणि माजी केंद्रीय मंत्री एम. जे. अकबर यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप झाले. याप्रकरमामध्ये दिल्ली न्यायालयानं अकबर यांना मोठा धक्का दिला आहे. पत्रकार प्रिया रमानी यांनी अकबर यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप केले होते. त्यानंतर एम. जे अकबर यांनी प्रिया रमानी यांच्याविरोधात मानहानीचा दावा केला होता. पण, अकबर यांचा दावा दिल्ली न्यायालयानं फेटाळून लावला आहे. आपल्या आरोपामध्ये प्रिया रमानी यांनी फोनवर अश्विल बोलणं, मेसेज करणं असे देखील आरोप केले होते. त्यानंतर एम. जे. अकबर यांनी दिल्लीतील न्यायालयात मानहानीचा दावा केला होता.
लैंगिक अत्याचाराचा आरोप करताना प्रिया रमानी यांनी त्यावेळी मी 23 वर्षांची होते. तेव्हा 43 वर्षाच्या अकबर यांनी मला दक्षिण मुंबईतील एका अलिशान हॉटेलमध्ये मुलाखतीकरता बोलावलं. त्यानंतर त्यांनी मला ड्रिंकची ऑफर देत माझ्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. या आरोपादरम्यान एम. जे. अकबर हे नायजेरिया दौऱ्यावर होते. त्यानंतर त्यांना आपल्या केंद्रीय मंत्रिपादाचा पदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
Journalist Priya Ramani has pleaded not guilty and claimed trail as a Delhi court frames defamation charge against her in a case filed by former Union minister MJ Akbar. Next date of hearing is May 4. pic.twitter.com/5Ps4LTZphB
दरम्यान, प्रिया रमानी यांच्यासह 15 महिलांनी अकबर यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप केले होते. अकबर हे 'द टेलिग्राफ', 'एशियन एज' आणि 'द संडे गार्डियन' या वृत्तपत्रांचे संपादक होते. आरोपानंतर अकबर यांनी आपल्याविरूद्धचे सर्व आरोप खोटे आणि निराधार असल्याचा खुलासा केला होता. हॉटेलच्या खोलीत बोलावून अश्लिल संभाषण करणं, दारू पिण्यासाठी आग्रह करणं, आक्षेपार्ह शेरेबाजी करणं असे अनेक आरोप एम.जे. अकबर यांच्यावर लावण्यात आले होते. महत्त्वाची बाब म्हणजे एम. जे. अकबर यांनी आपली बाजू कोर्टात मांडण्यासाठी 97 वकिलांची फौज उभी केली होती.
VIDEO: निवडणूक चिन्हाचा असाही प्रचार; बॅटच्या आकारात केली पिकाची कापणी