S M L
Football World Cup 2018

'बीपीटी'कडून रुग्णाच्या नातेवाईकांसाठीही मायेचं छत

Sachin Salve | Updated On: Mar 30, 2017 11:03 PM IST

'बीपीटी'कडून रुग्णाच्या नातेवाईकांसाठीही मायेचं छत

उदय जाधव,मुंबई

30 मार्च : मुंबईतल्या टाटा हॉस्पिटलमध्ये देशभरातून रूग्ण उपचारांसाठी येतात. मोठ्या संख्येने आलेल्या या रुग्णांची आणि त्यांच्या नातेवाईकांची हाॅस्पिटल परीसरात राहण्याची नेहमीच गैरसोय होते. त्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना राहण्यासाठी मुंबई पोर्ट ट्रस्टने निवास्थान बांधले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या निवास्थानाचं आज उद्धघाटन करण्यात आलं. त्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना मोठी दिलासा मिळालाय.

मुंबईतलं टाटा हाॅस्पिटल... कॅन्सर सारख्या आजारावर उपचार करण्यासाठी या हाॅस्पिटलमध्ये देशभरातून रुग्ण येतात. मोठ्यासंख्येने आलेले रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची राहण्याची कोणतीच व्यवस्था नसल्यामुळे, त्यांना हाॅस्पिटलबाहेर रस्त्यांवरच रहावं लागत होते. आता या निवास्थानामुळे १६५ खोल्या रुग्णांसाठी उपलब्ध होणार आहेत. आणि इथं चांगल्या सुविधा मिळत असल्याचंही रुग्णांचे नातेवाईक सांगतायेत.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या निवस्थानाचं उद्धघाटन करण्यात आलं. यावेळी प्रसिद्ध सिने अभिनेते नाना पाटेकरही उपस्थित होते.

मुंबई पोर्ट ट्रस्टंची मोठी जागा शहरात आहे. या जागेवर अनेक सामाजिक उपक्रम सुरू करता येऊ शकतात. टाटा हाॅस्पिटल प्रमाणेच महापालिका आणि राज्य सरकारच्या हाॅस्पिटलमधील रुग्णासाठी, अशा निवास्थानांची खूप मोठी गरज आहे. आणि ही मागणी पूर्ण करण्यासाठी सरकारने युद्धपातळीवर काम सुरू केलं पाहिजे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 30, 2017 10:40 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close