Home /News /news /

CCTV मध्ये मशिदीत जाताना दिसले मौलाना साद, तबलिगी कार्यक्रमानंतर पहिल्यांदाच निघाले बाहेर

CCTV मध्ये मशिदीत जाताना दिसले मौलाना साद, तबलिगी कार्यक्रमानंतर पहिल्यांदाच निघाले बाहेर

    नवी दिल्ली, 13 जून : निजामुद्दीनच्या मरकझ इथे तबलिगी जमातीच्या झालेल्या कार्यक्रमात चर्चेत आलेले मौलाना साद शुक्रवारी सुमारे अडीच महिन्यांनंतर पहिल्यांदाच घराबाहेर पडले. दिल्लीच्या झाकीर नगर इथल्या अबू बकर मशिदीत त्यांनी नमाज अदा केली. यावेळी ते मशिदीत जाताना सीसीटीव्हीमध्ये कैद झाले. सीसीटीव्हीमध्ये आपण पाहू शकता की मशिदीतून बरेच लोक बाहेर येताना दिसत आहेत. दरम्यान, मौलाना साद यांच्या हातामध्ये काहीतरी वस्तू आहे आणि ते मशिदीतून बाहेर पडताना दिसत आहेत. एक लहान मूलही त्यांच्याबरोबर असल्याचं सांगण्यात येत आहे. लॉकडाऊनच्या सुरुवातीला तबलीगी जमातीने आयोजित केलेल्या कार्यक्रमामुळे त्यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आली होती. त्यांच्या अटकेसाठीही पोलिसांनी बर्‍याच ठिकाणी छापे घातले. त्यानंतर त्यांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आलं होतं. मिळालेल्या माहितीनुसार, मौलाना साद यांनी अजूनही आपली कोरोना चाचणी दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे सादर केलेली नाही. देशात कोरोनाचा प्रादुर्भाव झाला असताना दिल्लीतील निझामुद्दीन परिसरात तबलिगी समाजानं मरकझ कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. त्यात सहभागी झालेल्या विदेशी नागरिकांवर केंद्रीय गृहमंत्रालयानं भारतात येण्यास बंदी घालण्यात आली होती. दिल्ली पोलिसांनी केलेल्या शिफारिशीनंतर गृहमंत्रालयानं हा निर्णय घेतला होता. दुसरीकडे, तबलिगी समाजाचा प्रमुख मौलाना साद यांच्याविरुद्ध कसून चौकशी सुरू आहे. मौलाना साद आपल्या कुटुंबीयासोबत जामिया नगरात राहात असल्याची माहिती सूत्रोंनी दिली होती. दिल्ली हायकोर्टानं निझामुद्दीन येथील मरकज प्रकरणी 955 विदेशी नागरिकांना 9 वेग-वेगळ्या ठिकाणी ठेवण्याचे आदेश काही दिवसांपूर्वी दिले होते. न्यायमूर्ती विपिन सांघी आणि न्यायमूर्ती रजनीश भटनागर यांच्या न्यायपीठात व्हिडिओ कॉन्फ्रेंसिंगच्या माध्यमातून या प्रकरणी सुनावणी झाली होती. विना परवानगी तबलिगी समाजाचे विदेशी नागरिक कुठेही जाऊ शकत नाही, असे निर्देश हायकोर्टानं दिले होते. एवढंच नाही तर या नागरिकांच्या खाण्या-पिण्याची सर्व व्यवस्था तबलीगी जमातने ठेवावी, असेही हायकोर्टानं आपल्या आदेशात म्हटलं होतं. विदेशी नागरिकांना ज्या ठिकाणी ठेवण्यात येईल, तेथून त्यांना कुठे जाण्याची परवानगी नसेल. सध्या या नागरिकांना दिल्लीतील विविध क्वारंटाईन सेंटर्समध्ये ठेवण्यात आलं होतं. संपादन - रेणुका धायबर
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    Tags: Corona, Corona vaccine

    पुढील बातम्या