पत्नीच्या मृत्यूनंतर समोर आलं धक्कादायक सत्य, लग्नाआधी पतीने केलं होतं...!

एका मृतदेहाच्या अंत्यविधीत रुढी-परंपरेवरून मोठा वाद झाला आणि त्यातून सगळ्यांना चक्रावून सोडणार एक सत्य समोर आलं.

News18 Lokmat | Updated On: Oct 23, 2019 02:53 PM IST

पत्नीच्या मृत्यूनंतर समोर आलं धक्कादायक सत्य, लग्नाआधी पतीने केलं होतं...!

मथुरा (उत्तर प्रदेश), 23 ऑक्टोबर : गेल्या काही दिवसांमध्ये गुन्हेगारीचे धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. आताही हैराण करणारा एक खळबळजनक प्रकार घडला आहे. एका मृतदेहाच्या अंत्यविधीत रुढी-परंपरेवरून मोठा वाद झाला आणि त्यातून सगळ्यांना चक्रावून सोडणार एक सत्य समोर आलं. मंगळवारी एका विवाहित महिलेला मृत्यू झाला. त्यानंतर गावातील लोक तिच्या अंत्यसंस्काराची तयारी करत होते. याचवेळी पती म्हणाला की तो पत्नीच्या मृतदेहाला पुरणार. यानंतर असं काही झालं ज्यावर तुमचा विश्वास बसणार नाही.

जेव्हा पत्नीचा मृतदेह पुरायचा का असा प्रश्न गावकऱ्यांकडून विचारण्यात आला तेव्हा मी धर्म परिवर्तन केलं असल्याचं सगळ्यांना सांगितलं. या सगळ्यानंतर गावातील लोकांनी तिथून पाय काढला. त्यानंतर काही मुस्लिम नागरिकांच्या मदतीने अखेर पत्नीला पुरण्यात आलं. खरंतर पत्नी हिंदू होती आणि पती मुस्लिम. त्यामुळे लग्नाला विरोध करण्यात आला. त्यामुळे पतीने धर्म परिवर्तन केलं.

इतर बातम्या - भारत-पाक सीमेवर गोळीबार, महाराष्ट्राच्या पुत्राला वीरमरण!

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशच्या लोहई गावात राहणाऱ्या राजवीर सिंह उर्फ राजू ठाकुरने किमान एक महिना आधी मुगलसरायच्या रेहाना नावाच्या युवतीसोबत विवाह केला. मंगळवारी अचानक रेहानाची प्रकृती खालावली आणि यात तिचा मृत्यू झाला. या दुखद घटनेनंतर कुटुंबीय आणि गावातील लोक अंत्यविधीसाठी आले. पण पतीने पत्नीच्या मृतदेहाला अग्नीदेण्याआधीच मी पत्नीचा मृतदेह  पुरणार असल्याचं म्हटलं.

इतर बातम्या - सातारा जिल्ह्यातील निकाल हाती येण्यास लागणार 12 तासांपेक्षा जास्त कालावधी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: hindu
First Published: Oct 23, 2019 02:53 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...