मंदिरात निघालेल्या महिलेवर सामूहिक बलात्कार, जंगलात नेऊन ओळखीच्याच लोकांनी केले अत्याचार!

मंदिरात निघालेल्या महिलेवर सामूहिक बलात्कार, जंगलात नेऊन ओळखीच्याच लोकांनी केले अत्याचार!

मंदिरामध्ये दर्शनासाठी जाणाऱ्या महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. मंदिरात जाणाऱ्या महिलेला पळवून नेऊन तिच्यावर अज्ञात स्थळी बलात्कार करण्यात आला आहे.

  • Share this:

उत्तर प्रदेश, 31 ऑगस्ट : भारतात महिला कुठेही सुरक्षित नसल्याचं वारंवार समोर आलं आहे. अल्पवयीन मुलींवर आणि महिलांवर बलात्कार होण्याचं प्रमाणही वाढलं आहे. बलात्काराचा असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मंदिरामध्ये दर्शनासाठी जाणाऱ्या महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. मंदिरात जाणाऱ्या महिलेला पळवून नेऊन तिच्यावर अज्ञात स्थळी बलात्कार करण्यात आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरून गेला आहे.

गावात राहणारी महिला ही शुक्रवारी संध्याकाळी कोकिलावनमध्ये असलेल्या शनि मंदिरात दर्शनासाठी चालली होती. तेव्हा गावाबाहेरच गाडीमध्ये काही लोक आले आणि त्यांनी गाडीमधून मंदिरात सोडत असा महिलेला हट्ट केला. तिने नकार दिल्यानंतर त्यांनी तिला जबरदस्ती गाडीमध्ये बसवलं आणि अज्ञात स्थळी घेऊन गेले. त्यानंतर सगळ्यांनी एकामोगमाग एक महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

श्माम सुंदर आणि लाडली दास महाराज अशी मुख्य आरोपींची नावं असल्याची माहिती देण्यात आली आहे. उत्तर प्रदेशच्या मथुरा इथे हा धक्कादायक प्रकार घडला आहे. पीडित महिलेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, 2 लोक मोटरसायकीलवर आले आणि त्यांनीदेखील बलात्कार केला. पोलिसांनी पीडित महिलेच्या सांगण्यानुसार आरोपींविरोध तक्रार दाखल केली असून प्रकरणाचा कसून तपास सुरू आहे.

इतर बातम्या  - बाप्पाच्या आगमनाआधी 'या' भागांत मुसळधार पाऊस, काही ठिकाणी होणार अतिवृष्टी!

दरम्यान, पीडित महिला विवाहित असल्याचं सांगण्यात येत आहे.  शुक्रवारी पीडित महिला शनि मंदिरामध्ये दर्शनासाठी चालली होती. त्यावेळी लाडली दास आणि एका अनोळखी व्यक्तीने पुलावर अडवलं आणि गाडीत बसण्यासाठी सांगितलं. पण तिने नकार देऊन पुढे चालत गेली. त्यानंतर आरोपींनी महिलेला जबरदस्ती गाडीमध्ये बसवलं आणि तिला जंगलात घेऊन गेले. तिथे तिच्यावर अनेक लोकांनी बलात्कार केल्याचं पीडित महिलेने पोलिसांना सांगितलं आहे.

इतर बातम्या  - मोदींचं नाव घेताच बसला शॉक, पाहा पाकिस्तानच्या 'आयटम' मंत्र्याचा व्हायरल VIDEO

या संपूर्ण प्रकरणात एसएसपी शलभ माथुर आरोपींवर तात्काळ कारवाई करण्याचं आदेश दिले आहेत. पीडितेने दिलेल्या माहितीनुसार, आरोपींमध्ये काही ओळखीचे तर काही लोक अनोळखी होते. तर या सगळ्यानंतर आता महिलेची वैद्यकीय चाचणी करण्यात येणार आहे.

SPECIAL REPORT : पाकमध्ये शीख धर्मगुरूच्या मुलीचं अपहरण, मुस्लिम तरुणासोबत निकाह!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: gang rape
First Published: Aug 31, 2019 06:34 PM IST

ताज्या बातम्या