• VIDEO : माथेरानच्या राणीचा नवा साज बघितला का?

    News18 Lokmat | Published On: Nov 23, 2018 05:44 PM IST | Updated On: Nov 23, 2018 06:04 PM IST

    माथेरान, 23 नोव्हेंबर : माथेरानला जाणाऱ्या पर्यटकांसाठी एक खुशखबर आहे. नेरळ-माथेरान टॉय ट्रेनला आता आकर्षक रंगाचे आणि निसर्गचित्रांचं पेटींग असलेले डबे जोडण्यात आले आहेत. माथेरानच्या राणीला नवा साज चढवल्यानं तीचा नूरच पालटून गेलाय. त्यामुळे या गाडीतून प्रवास करणं आता अधिक सुखद ठरणार आहे. नवा साज परिधान ल्यायल्यानंतर या ट्रेनची पहिली फेरी शुक्रवारी सकाळी पावणे सात वाजता नेरूळवरून माथेरानच्या दिशेने रवाना झाली. माथेरानातील वैभवाच्या खाणाखुणा अंगावर मिरवीत डोंगरदऱ्यातून धावणारी हि मिनीट्रेन पर्यटकांना आता अधिक आकर्षित करणार आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close