संदिप राजगोळकर, बंगळूरू,ता.17 जून : गौरी लंकेश यांच्या हत्याप्रकरणी कट रचणाऱ्या मास्टर माईंडची ओळख पटली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुन्ना या नावाच्या व्यक्तीने हत्येसाठी प्रवृत्त केलं अशी कबूली या प्रकरणात अटकेत असलेला संशयित आरोपी परशुराम वाघमारे यानं एटीएस कडे दिल्याची माहितीही त्याने दिली.
यु ट्यूबवर गोरी लंकेश यांची अनेक भाषणं ऐकली आणि गौरा लंकेश यांची माहिती काढल्याची कबूली वाघमारे यानं दिली. या मुन्नानेच वाघमारेचं ब्रेन वॉश केलं असल्याचंही सूत्रांनी सांगितलं.
धर्मरक्षणासाठीच गौरी लंकेश यांची हत्या केली अशी कबुली हल्लेखोर परशुराम वाघमारेने दिली होती. परशुरामनंच गौरी लंकेश यांच्यावर गोळ्या चालवल्या होत्या. त्याने बेळगावात पिस्तुल चालवण्याचं प्रशिक्षण घेतलं.
तो अनेक दिवस गौरी लंकेश यांच्या मागावर होता.
कर्नाटकमधील सिंदगीत राहणारा परशुराम हिंदुत्ववादी संघटनेशी संबंधित आहे. कलबुर्गी, पानसरे आणि गौरी लंकेश या तिन्ही हत्या एकाच पिस्तूलातून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
संबंधित बातम्या -