नांदेड, 30 एप्रिल : नांदेड शहरातील वाजेगाव परिसरात चालत्या ट्रकने अचानक पेट घेतला. खताने भरलेला ट्रक नांदेडच्या एमआयडीसी येथील कारखान्यात जात होता. भर रस्त्यात ट्रकला आग लागल्याने बघ्यांनी गर्दी केली. ट्रक चालकाने उडी मारल्याने पुढील अनर्थ टळला. ट्रकमध्ये खताचा मोठ्याप्रमाणात साठा होता. आग एवढी भीषण होती की आगीत संपूर्ण खताची पोती जळून खाक झाली.