मुंबई : कामगार रुग्णालय आग दुर्घटनेत मृतांचा आकडा वाढला, मृतांची संख्या ८

मुंबई : कामगार रुग्णालय आग दुर्घटनेत मृतांचा आकडा वाढला, मृतांची संख्या ८

रुग्णालयाला काचेची तावदानं असल्यामुळे आगीचे धूळ आतच पसरत राहिले. त्यामुळे श्वास कोंडून आठ जणांचा मृत्यू झाला

  • Share this:

मुंबई, १८ डिसेंबर २०१८- मुंबईच्या अंधेरी मरोळ येथील कामगार रुग्णालयाला लागलेल्या आगीत ८ जणांचा मृत्यू झाला असून यात ३ महिन्यांच्या मुलीचाही समावेश आहे. यात १५७ जण जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या कुपर, ट्रॉमा, होली स्पिरीट रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सोमवारी (१७ डिसेंबर) कामगार रुग्णालयात दुपारी आग लागली. रुग्णालयाला काचेची तावदानं असल्यामुळे आगीचे धूळ आतच पसरत राहिले. त्यामुळे श्वास कोंडून आठ जणांचा मृत्यू झाला. त्यात एका महिलेने भीतीने चौथ्या मजल्यावरुन खिडकीतून उडी टाकली. यातच तिचा मृत्यू झाला.

चौथ्या मजल्यावर ऑपरेशन थिएटरजवळ शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. अग्निशमन दलाने शिडी आणि दोर लावून अडकलेल्या रुग्णांना बाहेर काढलं. तसंच टेरेसवरून दोरखंडाच्या सहाय्यानं आगीत अडकलेल्यांना इमारतीबाहेर काढण्याचे प्रयत्न केले गेले. तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आली. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. वेळीच रुग्णालयाचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ बचावाची कारवाई केल्यामुळे 109 जणांना वाचवण्यात यश आलं.

दरम्यान, एका रुग्णाने आपला अनुभव सांगताना म्हटले की, त्याची MRI चाचणी सुरू होती. त्याच सुमारास रुग्णालयात आग लागली. तेव्हा हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी त्या रुग्णाला तातडीनं मशिनमधून बाहेर काढलं आणि त्याचा जीव वाचला. चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या मजल्यावर गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती.

VIDEO: शिवाजी महाराजांच्या वेषात संसदेत अवतरले 'हे' खासदार

First published: December 18, 2018, 10:50 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading