फलटणमध्ये लाकडाच्या कंपनीला भीषण आग, 15 कोटींचं लाकूड जळून खाक

फलटणमध्ये लाकडाच्या कंपनीला भीषण आग, 15 कोटींचं लाकूड जळून खाक

फलटण येथील वाठार निंबाळकर परिसरातील आयुर ट्रेडर्स या लाकडाच्या कंपनीला भीषण आग लागली आहे.

  • Share this:

सातारा, 31 ऑगस्ट : फलटण येथील वाठार निंबाळकर परिसरातील आयुर ट्रेडर्स या लाकडाच्या कंपनीला भीषण आग लागली आहे. शॉर्टसर्कीट झाल्यामुळे दोन एकरामध्ये ही आग लागली आहे. रात्री 2च्या सुमारात शॉकसर्कीट झाला. ही आग इतकी मोठी होती की यात 3 ट्रक, 4 ट्रक्टर आणि लाकडाचे 15 कोटीचे नुकसान झाले आहे. लाकडांना आग लागल्याने आगीची तीव्रता वाढत होती, पण योग्य वेळी पोहचून अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणल्यामुळे मोठी जीवित हानी थांबण्यात आली आहे.

आग लागल्याची माहिती मिळताच फलटण नगरपालिकेचे अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले आहे. आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहे. आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आलं आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या तीव्र आगीत सुदैवाने कोणतीच जीवीत हानी झालेली नाही. पण मोठ्या प्रमाणात आर्थिक आणि औद्योगिक नुकसान झालं असल्याचं सांगण्यात येत आहे. यात कंपनीमध्ये उभे असलेले 3 ट्रक आणि 4 ट्रक्टर जळून खाक झाले आहेत.

दरम्यान, पोलिसही घटनास्थळी दाखल झाले आहेत. नेमक्या कोणत्या कारणाने ही आग लागली याचा पोलीस आता तपास घेत आहे. रात्रीची वेळ असल्याने परिसरात कोणीही नव्हत त्यामुळे यातून मोठी जीवित हानी टळली असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. तर लाकडाची कंपनी असल्यामुळे आगीनेही जोरात पेट घेतला. यात 15 कोटींचे लाकूड जळून खाक झाले आहे. त्यामुळे या भीषण आगीत मोठे औद्योगिक नुकसान झाले आहे.

Bigg Boss 12 : लिक झाली यादी, हे 6 सेलिब्रिटी होणार सहभागी

First published: August 31, 2018, 9:32 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading