05 मे : अतिरेकी कारवायांमुळे धूमसत असलेल्या काश्मीरमध्ये लष्करानं दशकभरातलं सर्वात मोठं ऑपरेशन हाती घेतलं आहे. काल रात्रीपासून हे ऑपरेशन सुरू झालं असून जवळपास 30 गावांना लष्करी जवान, पोलीस आणि सीआरपीएफनं वेढा घातलाय. यात जवळपास 4 हजार पेक्षा जास्त सुरक्षा जवान सहभागी झालेत.
30 अतिरेक्यांचा एक व्हीडीओ व्हायरल झाल्यामुळे, त्यांच्या शोधासाठीच लष्करानं दक्षिण काश्मीरमधल्या शोपियान जिल्ह्यात हे मिशन हाती घेतलंय.
काही ठिकाणी स्थानिकांनी लष्कराच्या या मिशनला विरोध केला. तर काही ठिकाणी अतिरेक्यांनी लष्करावर हल्लाही केला. त्यात तीन जवान जखमी झालेत. जवानांनीही पेलेट गन्सचा वापर केला. त्यात तीन जण जखमी झालेत.
का केलं जातंय सर्वात मोठं ऑपरेशन?
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Operation, Terrorist, अतिरेकी, जम्मू काश्मीर