नवी दिल्ली, 21 जून : देशातील सर्वात मोठी कार निर्माती कंपनी मारुती सुझुकी इंडिया (Maruti Suzuki India ) कारच्या किमती जुलै महिन्यापासून वाढवणार आहे. कंपनीने रेगुलेटरी फायलिंगमध्ये याबाबत माहिती दिली आहे. तसेच कंपनीने किमती वाढवण्याचं कारण देखील दिलं आहे. कंपनीने म्हटलंय की, वाढत्या किमतीचा भार ग्राहकांवर टाकण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे किमती वाढवल्या जाणार आहेत. किमतीतील वाढ ही कारच्या वेगवेगळ्या मॉडेलसाठी असेल. कंपनीने सोमवारी रेगुलेटरी फायलिंग मध्ये म्हटलं की, "गेल्या एका वर्षात कंपनीच्या वाहनांची किंमत वाढली आहे. त्यामुळे काही अतिरिक्त भार किमतीत वाढ करून ग्राहकांवर टाकणं गरजेचं झालंय."
एप्रिल महिन्यात मारुतीने वाढवली होती किंमत
मारुतीने दूसऱ्या क्वार्टरमध्ये किंमत वाढवण्याची योजना केली आहे. ही दरवाढ कारच्या वेगवेगळ्या मॉडेल्सनुसार केली जाईल. याआधी मारुतीने एप्रिल महिन्यात त्यांच्या कारच्या किमतीत वाढ केली होती. या वर्षाच्या सुरुवातीला कंपनीनं म्हटलं होतं की त्यांची इनपूट कॉस्ट (Input cost) वाढली आहे. यावेळी कंपनीने कारच्या किमतीत 34 हजार रुपयांपर्यंत वाढ केली होती.
हे वाचा - बुकिंग ओपन होताच या Electric Bike ची धूम, 2 तासात 50 कोटींची ऑर्डरऑटो सेक्टर मध्ये तेजी येणार
देशभरात कोरोनाची दुसरी लाट (second wave of corona) ओसरली आहे. कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने अनेक राज्यांनी लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिली असून निर्बंध हटवले आहेत. अनलॉक सुरू झाल्याने अनेक ऑटोमोबाइल कंपन्यांनी प्रॉडक्शन वाढवण्यास सुरुवात केली आहे. ऑटोमोबाइल कंपन्यांना राज्यांमध्ये डीलरशिप्स खुलण्यासह बिझनेसमध्ये तेजी येईल, अशी आशा आहे.
लॉकडाउनमुळे या कंपन्यांच्या एक्सपोर्टवरही (export) परिणाम झाला होता. मारुती सुझुकीच्या प्रवक्त्यांनी सांगितलं होतं की कंपनीच्या प्लांट्समध्ये प्रॉडक्शन सुरू झालं असून त्यासाठी सेफ्टी प्रोटोकॉल लागू करण्यात आले आहेत. दरम्यान गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाने हाहाकार माजवला आहे. देशात पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत कडक लॉकडाऊन (lockdown) लावण्यात आले त्यामुळे अनेक व्यवसाय ठप्प झाले आहेत. देशातील दुसरी लाट ओसरत असल्याचं चित्र सध्या दिसत आहे. त्यामुळे राज्य सरकारांनी हळुहळू निर्बंध हटवले आहे.
परिस्थिती आणि व्यवसाय थोडे पूर्व पदावर येत असतानाच येत्या दोन महिन्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा आरोग्य तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे. त्यामुळे तीन महिन्यांनी आता कुठे सुरू झालेले व्यवसाय पुन्हा निर्बंधांमुळे बंद पडण्याची शक्यता आहे. कोरोनामुळे ऑटोमोबाईल सेक्टरदेखील (Automobile sector) मोठ्या प्रमाणात प्रभावित झाले आहे.
Published by:Atharva Mahankal
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.