Home /News /news /

भरधाव मारुती एर्टिगा कार झाली आउट ऑफ कंट्रोल, रस्ता सोडून उलटली; एक ठार

भरधाव मारुती एर्टिगा कार झाली आउट ऑफ कंट्रोल, रस्ता सोडून उलटली; एक ठार

आज सोमवारी सकाळी साडे सहाच्या दरम्यान बाळापूर जवळील कान्हेरी फाट्यानजीक हा अपघात झाला.

बाळापूर, 12 ऑक्टोबर : अकोला जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावरील बाळापूर-खामगाव रोडवर भरधाव कारला झालेल्या अपघातात चालक जागीच ठार झाला आहे. तर अन्य पाच जण जखमी आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आज सोमवारी सकाळी साडे सहाच्या दरम्यान बाळापूर जवळील कान्हेरी फाट्यानजीक हा अपघात झाला.  मारुती एर्टिगा जाणाऱ्या एम.एच.49 बी.जी 6577 या कारने अकोल्याहून खामगावकडे जात होते. गाडी कान्हेरी फाट्याजवळ आल्यावर अचानक चालकाने गाडीवरील नियंत्रण सुटले. कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे कार रस्त्याच्या बाजूला जाऊन आदळली आणि उलटली. झुंज संपली, कोरोनाशी दोन हात करताना सुरेखा महाडिक यांचे निधन हा अपघात इतका भीषण होता की, भरधाव कारही रस्त्याच्या बाजूला जोरात आदळली आणि पलटी झाली. यात कारच्या उजव्या बाजूच्या भागाचा चुराडा झाला. या अपघातात योगेश गायधने (वय 40, रा.नागपूर) याचा जागीच मृत्यू झाला. तर शशांक राजपूत, मनीष बोरिकर, चेतन मुके, विजय चौधरी, दिनेश निकम सर्व राहणार नागपूर  हे जखमी झाले. जखमींनी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मध्यरात्री अज्ञातांनी बसवला शिवरायांचा पुतळा, कोल्हापुरातील बांबवडेमध्ये तणाव घटनेची माहिती मिळताच बाळापूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार नीतीन शिंदे यांचे मार्गदर्शनात पोलिस हवालदार विजय जामनिक, संतोष गिरी यांचेसह महामार्ग पोलीस मदत केंद्राचे प्रभारीअधिकारी राजू सोळंके, राजू अहिर, इंगळे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांच्या पथकाने वाहतूक सुरळीत करीत जखमींना पुढील उपचारासाठी रुग्णालयात पाठविले तर पुढील तपास बाळापूर पोलीस करीत आहेत.
Published by:sachin Salve
First published:

Tags: Akola

पुढील बातम्या