Home /News /news /

मंगळाचा मेष राशीत प्रवेश; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींसाठी खुलतील व्यापार अन् करिअरच्या प्रगतीचे दरवाजे

मंगळाचा मेष राशीत प्रवेश; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींसाठी खुलतील व्यापार अन् करिअरच्या प्रगतीचे दरवाजे

मंगळाचा मेष राशीत प्रवेश; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींसाठी खुलतील व्यापार अन् करिअरच्या प्रगतीचे दरवाजे

मंगळाचा मेष राशीत प्रवेश; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींसाठी खुलतील व्यापार अन् करिअरच्या प्रगतीचे दरवाजे

27 जून रोजी मंगळ ग्रह मेष राशीत प्रवेश करत असून, हे परिवर्तन तीन राशींसाठी शुभ राहणार आहे. कोणत्या आहेत त्या राशी जाणून घ्या.

नवी दिल्ली, 13 जून : ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांच्या दशेवर एखाद्या व्यक्तीची प्रगती, आयुष्यात होणाऱ्या घटना अवलंबून असतात. प्रत्येकाची रास त्या-त्या व्यक्तीसाठी महत्त्वाची असते. कालानुक्रमाने ग्रहांची दशा विविध व्यक्तींसाठी कधी फलदायी असते तर कधी त्रास देणारी ठरू शकते. यंदाचा जून महिना मिथुन, कर्क आणि सिंह राशीच्या व्यक्तींसाठी करिअरच्या अनुषंगाने फार लाभदायी असणार आहे. 27 जून रोजी मंगळ ग्रह मेष राशीत प्रवेश करत असून, हे परिवर्तन वरील तीन राशींसाठी शुभ राहणार आहे. ‘झी न्यूज हिंदी’ने या संदर्भात वृत्त दिलं आहे. मंगळाच्या भ्रमणाचा जून महिन्यात काय होणार परिणाम ज्योतिषशास्त्रात मंगळ ग्रहाला ऊर्जा, धैर्य, भूमी व विवाहासाठी महत्त्वपूर्ण मानलं गेलं आहे. त्यामुळे एखाद्या कुंडलीमध्ये मंगळ ग्रहाची स्थिती खूप महत्त्वाची मानण्यात आली आहे. येत्या 27 जून 22 ला मंगळ ग्रह आपली जागा बदलणार आहे. मंगळ ग्रह मेष राशीत प्रवेश करणार असल्याने त्याचा परिणाम सर्व राशींवर होणार आहे. परंतु, मिथुन, कर्क आणि सिंह या तीन राशींना मंगळाचं भ्रमण अत्यंत फलदायी ठरणार आहे. करिअरमध्ये प्रगतिसह धनाचा लाभ व वैवाहिक सुखही मिळणार आहे. हेही वाचा - आज चंद्राचा शनीशी प्रतियोग; तुमच्या राशीवर काय परिणाम होणार पाहा राशिभविष्य मिथुन राशी : भागीदारीत फायदा, जोडीदाराकडून सहकार्य मंगळाचं भ्रमण मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी शुभ मानलं जातं. मिथुन राशी असणाऱ्या व्यक्तींच्या उत्पन्नात वाढ करण्यासह करिअरमध्येही याचा लाभ होईल. कामात झालेल्या सुधारणेमुळे आपली प्रतिमा सुधारण्यासाठी मदत होणार आहे. व्यवसायाच्या बाबतीत बोलायचं झाल्यास स्थिती उत्तम राहण्याची शक्यता आहे. चांगला धनलाभ होऊ शकतो. एखादी नवी ऑर्डर किंवा करार निश्चित होईल. भागीदारीमध्ये काम करणाऱ्यांनाही या काळात चांगला लाभ होणार आहे. विवाह झालेल्यांना त्यांच्या जोडीदारांकडून पूर्ण सहकार्य मिळणार आहे. कर्क राशी : पदोन्नती अन् वेतनवाढ मिळू शकते मंगळाचं भ्रमण हा कर्क राशी असणाऱ्या व्यक्तींच्या करिअरसाठी उत्तम काळ घेऊन आला आहे. नोकरीत बदल करायचा असल्यास त्याचा विचार करता येऊ शकतो. नोकरीची नवीन संधी तुम्हाला आनंद मिळवून देऊ शकते. पदोन्नती व वेतनात वाढ होण्याचा चांगला योग आहे. व्यापारी नवीन लोकांशी जोडले जाऊ शकतात. व्यवसाय वृद्धी होण्याचे चांगले योग आहेत. नवीन मालमत्ता खरेदी करू शकता. मोठा करार पूर्णत्वास जाण्याचीही शक्यता आहे. व्यवसायात मोठी गुंतवणूक करायची असल्यास चांगली संधी आहे. सिंह राशी : परीक्षा-इंटरव्ह्युची तयारी करणाऱ्यांना यश सिंह राशी असणाऱ्या व्यक्तींना नशिबाची साथ मिळण्यासाठी मंगळ ग्रहाची बदलणारी दशा महत्त्वपूर्ण कामगिरी बजावणार आहे. अडलेली कामं मार्गी लागण्यासाठी हा काळ उत्तम आहे. नशिबाची साथ मिळाल्याने नवीन संधी चालून येतील. सरकारी क्षेत्रात चांगला फायदा होईल. प्रवास करता येईल. भविष्याच्या दृष्टीने ते लाभदायी ठरेल. परीक्षा-इंटरव्ह्यूची तयारी करणाऱ्या व्यक्तींना मोठे यश मिळू शकतं. दरम्यान, ग्रह, तारे, नक्षत्रांच्या दशेवरून आपल्या जीवनात काय बदल होऊ शकतात हे जाणून घेणं ज्याचात्याच्या आस्था, मान्यतेचा विषय आहे. परंतु, दैनंदिन जीवनात वर्तमान व भविष्याची माहिती मिळवण्यासाठी ज्योतिषशास्त्राची मदत होत असल्याचे अनेकजण मानतात. तुम्ही तुमचा निर्णय घ्यायला हवा.
First published:

Tags: Astrology and horoscope

पुढील बातम्या