S M L

सुरू झालंय 'मंगळ' दर्शन, मुकला तर 2035 पर्यंत पाहावी लागेल वाट !

Updated On: Jul 31, 2018 07:21 PM IST

सुरू झालंय 'मंगळ' दर्शन, मुकला तर 2035 पर्यंत पाहावी लागेल वाट !

मुंबई, 31 जुलै : खग्रास चंद्रग्रहणानंतर आज खगोलप्रेमींसाठी आकाशात नवी पर्वणी वाट पाहतेय. मंगळ आणि पृथ्वीमधलं अंतर कमी होणार असून यामुळे सूर्यास्तानंतर आकाशात तांबूस रंगाचा मंगळ दिसणार आहे. याआधी 2003 मध्ये म्हणजेच 15 वर्षांपूर्वी असा योग पाहायला मिळाला होता. दरम्यान, यानंतर पुन्हा 17 वर्षांनी मंगळ पृथ्वीच्या जवळ येणार आहे. त्यामुळे अशी दुर्मिळ संधी तुम्ही चुकवू नका...

शिवसेनेला सत्ता मिळाली नाही तरी चालेल, पण भाजप नको : उद्धव ठाकरेंची रणनीती

आज मंगळवार ३१ जुलै रोजी मंगळग्रह पृथ्वीच्या जवळ ५ कोटी ७५ लक्ष किलोमीटर अंतरावर येणार असल्यामुळे  खगोलप्रेमीना मंगळ निरीक्षणाची सुवर्णसंधी मिळणार  असल्याचं खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितलं. या विषयी अधिक माहिती देताना ते म्हणाले की, मंगळ जेव्हा पृथ्वीपासून दूर जातो त्यावेळी तो पृथ्वीपासून ४० कोटी १० लक्ष किलोमीटर अंतरावर जातो. सध्या सर्वांना साध्या डोळ्यांनी रात्रीच्या प्रारंभी पूर्व आकाशात उत्तराषाढा नक्षत्रात  मंगळग्रहाचे सुंदर दर्शन होऊन तो रात्रभर आकाशात पाहता येईल.

कमालच झाली!,आरटीओने दिलं मुख्यमंत्र्यांना ट्रॅक्टर चालवण्याचं लायसन्स

Loading...
Loading...

तसंच तो लालसर रंगाचा दिसत असल्याने सर्वांना सहज ओळखता येईल. पंधरा वर्षांपूर्वी २७ आॅगस्ट २00३ रोजी  मंगळ ग्रह पृथ्वीच्याजवळ ५ कोटी ५७ लक्ष किलोमीटर अंतरावर आला होता. आजच्या नंतर पुन्हा सतरा वर्षांनी ११ सप्टेंबर २०३५ रोजी मंगळ पृथ्वीच्या जवळ ५ कोटी ६९ लक्ष किलोमीटर अंतरावर येणार आहे.

भारतीय शास्त्रज्ञांनी ५ नोव्हेंबर २०१३ रोजी मंगळ ग्रहाकडे पाठवलेले मंगळयान २४ सप्टेंबर २०१४ रोजी मंगळग्रहाकडे पोहोचले होते असंही सोमण यांनी सांगितलं.

कसा आहे आकाशातला दुर्मिळ योग?

मंगळ पृथ्वीच्या जवळ 5 कोटी 75 लक्ष किलोमीटर अंतरावर

जेव्हा मंगळ दूर जातो तेव्हा 40 कोटी 10 लक्ष किलोमीटर अंतर पडतं

आजचा योग साध्या डोळ्यांनी रात्रभर पाहता येणार

मंगळाच्या लालसर रंगामुळे सहज दर्शन शक्य

पुन्हा 17 वर्षांनी 11 सप्टेंबर 2035 मध्ये असा दुर्मिळ योग

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 31, 2018 07:08 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close