वंशाच्या दिव्यासाठी सुरू होता छळ.. अखेर विवाहितेने उचलले 'हे' पाऊल

वंशाच्या दिव्यासाठी सुरू होता छळ.. अखेर विवाहितेने उचलले 'हे' पाऊल

गुन्हा दाखल होत असल्याची कुणकुण लागताच ते सगळे फरार झाले आहेत.

  • Share this:

धुळे,29 नोव्हेंबर: शिरपूर तालुक्यातील साकवद येथे सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेने विष प्राशन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वंशाचा दिव्यासाठी मागील काही दिवसांपासून विवाहितेचा छळ सुरू होता. अखेर तिचे टोकाचे पाऊल उचलले. भाग्यश्री चेतन चव्हाण असे मृत विवाहितेचे नाव आहे. तिने 28 नोव्हेंबरला दुपारी विष प्राशन केले होते. तिच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना तिची प्राणज्योत मालवली. भाग्यश्री यांचे भाऊ दीपक कोळी याने शिरपूर पोलीसांत फिर्याद दिल्याने आत्महेत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वैद्यकीय उपचारासाठी पैशाची मागणी..

भाग्यश्रीला मुलबाळ होत नाही म्हणून तिने वैद्यकीय उपचारासाठी माहेरून पैसे आणावेत, यासाठी सासरच्या लोकांकडून तिचा छळ केला जात होता. या छळाला कंटाळून विवाहितेने विष प्राशन आत्महत्या केली. भाग्यश्रीच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या सासरच्या लोकांना अटक होत नाही तो पर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा तिच्या माहेरच्या लोकांना घेतल्याने काही रुग्णालयात परिसरात तणाव निर्माण झाला होता.

शिंदखेडा तालुक्यातील साळवे येथील माहेर असलेल्या भाग्यश्रीचा विवाह 2011 मध्ये शिरपूर तालुक्यातील साकवद येथील चेतन चव्हाणसोबत झाला. लग्नानंतर मुलबाळ न झाल्याने तुझ्यावर वैद्यकीय उपचार करायचे आहेत, त्यासाठी लागणारी रक्कम माहेरून आण अशी मागणी करत सतत छळ करण्यात येत होता. पैसे मिळत नसल्याने चिडून त्यांनी भाग्यश्रीचा शारीरिक व मानसिक छळ केला. या छळाला कंटाळून तिने आत्महत्या केली, असा आरोप भाग्यश्रीच्या नातेवाईकांनी केला आहे. भाग्यश्रीचे पती, सासू, सासरे, आजी सासू व दीर या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कुणकुण लागताच आरोपी फरार..

उपजिल्हा रुग्णालयात भाग्यश्रीच्या सासरचे लोक उपस्थित होते. मात्र, त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल होत असल्याची कुणकुण लागताच ते सगळे फरार झाले आहेत. त्यामुळे संतप्त झालेल्या साळवे येथील नातेवाईकांनी संशयितांना अटक केल्याशिवाय भाग्यश्रीचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी आक्रमक भूमिका घेतली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 29, 2019 03:35 PM IST

ताज्या बातम्या