राहुल खंदारे, प्रतिनिधी
बुलडाणा, 10 जुलै : बुलडाणा जिल्ह्यातील चिखली खामगावर महामार्गावर (chikhali khamgaon highway) ट्रक (truck) आणि ऑटो रिक्षाचा (auto rickshaw) भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एका 20 वर्षीय विवाहितेचा मृत्यू झाला तर सासू-सासरे जखमी झाले असून उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चिखली तालुक्यातील खामगाव रोडवरील बोरगाव वसु गावाजवळ ही घटना घडली घडली. शीतल मंगेश होगे(वय 20, रा.दहिगाव ता. चिखली) असं ठार झालेल्या विवाहितेचे नाव आहे. तर सासरे भास्कर होगे(55) आणि सासु लता होगे(50) हे जखमी झाले आहेत.
कंजूसपणाची तर हद्दच झाली! पैसे वाचवण्यासाठी ती करतेय काय काय; वाचूनच हैराण व्हाल
तिघेही जण चिखलीवरून दहिगावकडे ऑटो क्रमांक एमएच 28,एच 4723 ने चालले होते. बोरगाव वसु गावाजवळ ट्रक एमएल 01 एडी 1187ला ओव्हर टेक करण्याचा प्रयत्नात ट्रकचा धक्का ऑटोला लागला. त्यामुळे ऑटोत बसलेल्या शीतल होगे या बाहेर पडून ट्रकच्या मागच्या चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर सासु आणि सासुरे जखमी झाले असून त्यांच्यावर चिखली येथे उपचार सुरू आहेत.
OMG! 32 नाही तर 82; 17 वर्षीय तरुणाच्या जबड्यातील दात पाहून डॉक्टरही शॉक
धक्कादायक म्हणजे, शीतल यांचं 28 मे रोजी लग्न झालं होतं. लग्नाला दोन महिनेही होत नाही तेच शीतल यांच्या अपघाती निधनामुळे होगे कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. गावात याबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.