महिला शिक्षिकेने 15 वर्षाच्या विद्यार्थ्याला घेतलं दत्तक, ठेवले शारीरिक संबंध

महिला शिक्षिकेने 15 वर्षाच्या विद्यार्थ्याला घेतलं दत्तक, ठेवले शारीरिक संबंध

जेव्हा 15 वर्षाच्या मुलाला त्याच्या घरातून काढून टाकलं गेलं, तेव्हा 45 वर्षांची शिक्षिका रायना कल्वरने कायदेशीररित्या त्याचं पालकत्व स्वीकारलं.

  • Share this:

वॉशिंगटन, 07 डिसेंबर : एका विवाहित महिला शिक्षिकेवर 15 वर्षांच्या विद्यार्थ्याला दत्तक घेऊन त्याच्यासोबत शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे. हे प्रकरण अमेरिकेच्या न्यू जर्सीच्या ट्रेन्टनमधील आहे. या सगळ्या धक्कादायक प्रकारानंतर शिक्षिकेला निलंबित करण्यात आलं आहे.

जेव्हा 15 वर्षाच्या मुलाला त्याच्या घरातून काढून टाकलं गेलं, तेव्हा 45 वर्षांची शिक्षिका रायना कल्वरने कायदेशीररित्या त्याचं पालकत्व स्वीकारलं. मुलाचा असा दावा आहे की, बर्‍याच महिन्यांपासून शिक्षिकेने त्याच्याबरोबर दररोज शारीरिक संबंध बनवले.

इतर बातम्या - महाराष्ट्रात हैदराबाद घटनेची पुनरावृत्ती, बलात्कारानंतर महिलेची हत्या

या प्रकरणात अद्याप खटला चालू आहे. अटकेनंतर शिक्षिका रजेवर होती, परंतु आता कोर्टाचा निर्णय येईपर्यंत तिच्या शालेय शिक्षणावर बंदी घालण्यात आली आहे. या प्रकरणाची सध्या देशभर चर्चा सुरू आहे. शिक्षक हा विद्यार्थ्याचा गुरू असतो. गुरुनेच जर अशा प्रकारे कृत्य केलं तर कोणावर विश्वास ठेवणार अशा चर्चांना आता उधाण आलं आहे.

इतर बातम्या - मुंबईत मद्यधुंद कार चालकाच्या धडकेत तरुणीचा नाहक बळी, संतप्त नातेवाईकांचं आंदोलन

मुलाचे भविष्य खराब करण्यासाठी आणि लैंगिक शोषणासाठी शिक्षिकेवर कारवाई केली जात आहे. कोर्टाच्या कागदपत्रांनुसार, मुलाचा ताबा घेण्यापूर्वी शिक्षिका तरुणाशी अधिक जवळीक साधली होती. सुरुवातीला, शिक्षिका त्याला चुकीने स्पर्श करायची, परंतु त्याबद्दल मुलाने फारसा विचार केला नाही. नंतर, जेव्हा मुलाने शिक्षिकेशी संबंध ठेवण्यास नकार दिला तेव्हा तिने त्याच्यावर दबाव आणला. मिळालेल्या माहितीनुसार, शारीरिक संबंध ठेवण्यासाठी शिक्षिकेने मुलाला दत्तक घेतलं हे मुलाच्या लक्षात आलं.

इतर बातम्या - रिक्षा चालकाने केला चिमुकलीवर बलात्कार, रक्ताने माखलेल्या पीडितेवर उपचार सुरू

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 7, 2019 03:20 PM IST

ताज्या बातम्या