मुंबई, 12 जून : गेल्या वर्षी भय्यूजी महाराज यांनी 29 एप्रिल रोजी लग्न केलं. आई आणि बहिणीच्या आग्रहाखातर महाराज पुन्हा लग्नाला तयार झाले होते. मध्य प्रदेशमधल्या डॉ. आयुषी शर्मा यांच्याशी त्यांनी इंदूर इथं विवाह केला. 200 जणांच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा संपन्न झाला होता. आयुषी शिवपुरीच्या होत्या. पीएचडी केलेल्या होत्या.
त्यांचं पहिलं लग्न औरंगाबादच्या माधवी निंबाळकर यांच्याशी झालं होतं. 2015 मध्ये पहिल्या पत्नीच्या निधनानंतर भय्यूजी महाराज कोलमडून पडले होते. त्यांनी सार्वजनिक आयुष्यातून संन्यास घोषित केला होता. पहिल्या बायकोपासून त्यांना कुहू नावाची मुलगी आहे. ती पुण्यात शिकतेय.
दुसऱ्या लग्नाआधी एका महिलेनं आपले भय्यूजी महाराजांशी संबंध आहेत, असंही म्हटलं होतं.
आज तणावामुळे त्यांनी केलेली आत्महत्या धक्कादायक आहे. वयाच्या 50व्या वर्षी अशा पद्धतीनं आयुष्य संपवणं फारच दु:खदायक आहे.
थोडक्यात परिचय
अनुयायांकडून 'राष्ट्रसंत' उपाधी
नाव : डॉ. उदयसिंह देशमुख
जन्म : 29 एप्रिल 1968
जन्मगाव : सृजलपूर, इंदूर
20 व्या वर्षी मॉडेलिंग
दृष्टांत झाल्यानंतर आध्यात्मिक क्षेत्रात प्रवेश
1996 मध्ये सूर्योदय परिवार आणि आश्रमाची स्थापना
वेगवेगळ्या संस्थांच्या स्थापनेत वाटा
अनेमिक रुग्णांसाठी विशेष काम
भारतभरात 11,11,111 झाडं लावण्याचा संकल्प
विलासराव देशमुख आणि अनेक नेत्यांचे गुरू
2 वर्षांपूर्वी पत्नीचं हृदयविकाराने निधन
गेल्या वर्षी दुसरं लग्न
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा