चेहऱ्यावर मेकअप टिकत नाही म्हणून लिहिली 2 पानी सुसाईड नोड, महिलेची आत्महत्या

चेहऱ्यावर मेकअप टिकत नाही म्हणून लिहिली 2 पानी सुसाईड नोड, महिलेची आत्महत्या

डोळ्यातून वारंवार पाणी येत असल्याने मेकअप पुसून जातो. त्यामुळे मी सुंदर दिसत नाही म्हणून एका विवाहितेने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना अंबडच्या दत्तनगर भागातील माऊली चौकात घडली आहे.

  • Share this:

नाशिक, 14 फेब्रुवारी : सध्या आत्महत्या सारखं मोठं पाऊल उचलण्यासाठी कारण लागत नाही असं म्हणतात. त्याचाच एक धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये धडला आहे. डोळ्यातून वारंवार पाणी येत असल्याने मेकअप पुसून जातो. त्यामुळे मी सुंदर दिसत नाही म्हणून एका विवाहितेने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना अंबडच्या दत्तनगर भागातील माऊली चौकात घडली आहे.

आत्महत्येच्या या कारणामुळे संपूर्ण नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पोलिसांना विवाहितेने लिहिलेली चिठ्ठी मिळाली असून, त्यात तिने डोळ्यातून सारखं पाणी वाहत असतं. त्यामुळे  समस्या निर्माण झाल्या आहे. डोळ्यातून पाणी गळत असल्यामुळे मेकअप आणि काजळ टिकत नाही. म्हणून आत्महत्या करत असल्याचं नमूद केलं आहे.

रखमा भास्कर खरचान (वय 27, रा. माऊली चौक, दत्तनगर, अंबड, नाशिक) असं या विवाहितेचं नाव आहे. मेकअप पुसला जातो. त्यामुळे मी सुंदर दिसत नाही. यामुळे ही महिला नैराश्यात होती. या महिलेने आत्महत्या करण्याआधी 2 पानांची सुसाईड नोट लिहली होती.

माझं माझ्या पतीवर खूप प्रेम आहे असंही या महिलेने सुसाईड नोटमध्ये लिहलं आहे. त्यामुळे आता या प्रकरणाचा पोलीस वेगळ्या बाजूने तपास करत आहेत. पोलिसांनी महिलेचा मृतदेह ताब्यात घेत तो शवविवच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. तर पोलीस आता या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

दरम्यान, आताच्या या ग्लॅमरस जगात सुंदर दिसणं इतकं महत्त्वाचं आहे, की त्याच्या नैराश्यात येत या महिलेने आत्महत्या केली आहे. या संपूर्ण घटनेमुळे रखमा यांच्या कुटुंबीयांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे. तर त्यांच्या या आत्महत्येमुळे संपूर्ण नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

VIDEO : बजरंग दलच्या कार्यकर्त्यांनी व्हॅलेंटाईन साजरा करणाऱ्या जोडप्याचं जबरदस्ती लावलं लग्न

First published: February 14, 2019, 5:12 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading