अखेर ‘घाडगे अँड सून’मध्ये अक्षयसमोर येणार कियाराचं सत्य

अखेर ‘घाडगे अँड सून’मध्ये अक्षयसमोर येणार कियाराचं सत्य

कलर्स मराठीवरील ‘घाडगे अँड सून’ मालिकेमध्ये अक्षय आणि अमृताच्या आयुष्यात बऱ्याच घटना घडत आहेत.

  • Share this:

कलर्स मराठीवरील ‘घाडगे अँड सून’ मालिकेमध्ये अक्षय आणि अमृताच्या आयुष्यात बऱ्याच घटना घडत आहेत. घाडगे सदनमध्ये अक्कांमुळे पुन्हा एकदा अमृता आणि अक्षय नवरा बायको म्हणून वावरू लागले आहेत. कारण अक्कांना कियारा आणि अक्षयचं लग्न झालं आहे याबद्दल काहीच माहीत नाही. घरामध्ये विभागणी, इतकी वर्ष जोडून ठेवलेलं कुटुंब अचानक तुटल्यामुळे माई आणि अण्णा पूर्ण खचून गेले आहेत, तसेच कियाराही गरोदर आहे. या सगळ्यातच मालिकेमध्ये आता एक वेगळं वळण आलं आहे. कियारा गरोदर नाही याची खात्री अक्कांना पटते आणि अक्का हे सत्य अक्षयला सांगायचं ठरवतात.

मालिकेमध्ये आता पुढे काय होईल ? अक्षय कियाराचे सत्य घरच्यांना सांगू शकेल ? हे पाहणे रंजक असणार आहे.

कियाराने गरोदर असल्याचं खोटं सांगून घाडगे परिवाराला अंधारात ठेवलं आहे. एकीकडे सर्व कुटुंब तिची काळजी घेत आहे तर अक्कांना कियारा गरोदर नसल्याचा संशय येतो. कियाराचं वागणं बोलणं तसेच घरात वावरणं यामुळे ती गरोदर नसल्याची आक्काला खात्री पटते. आता ही बातमी अक्षयला सांगितल्यावर अक्षय काय करेल? घरच्यांना हे सत्य अक्षय कधी आणि कस सांगेल? घाडगे कुटुंब आणि विशेषत: माई यावर काय म्हणतील? कियारा घरात परतली आहे आता अमृताचं अस्तित्व घाडगे परिवारात काय असेल ? या सगळ्या प्रश्नांची उत्तर लवकरच प्रेक्षकांना मिळणार आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी नक्की पाहा घाडगे अँड सून रात्री ८.३० वाजता कलर्स मराठीवर.

VIDEO VIRAL : रजनीकांत यांनी मुलीच्या लग्नात असा धरला ठेका, की सर्वजण पाहातच राहिले


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 12, 2019 05:57 PM IST

ताज्या बातम्या