या मराठी रिअलिटी शोमधून दिसणार कॉमेडीचा बादशहा जॉनी लिवर

‘एक टप्पा आऊट’ या कॉमेडी रिअॅलिटी शोमधून जॉनी लिवर मराठी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

News18 Lokmat | Updated On: Feb 20, 2019 06:19 PM IST

या मराठी रिअलिटी शोमधून दिसणार कॉमेडीचा बादशहा जॉनी लिवर

ऑफिसच्या वेळा, मुलांचं शिक्षण, महिन्याचं बजेट, भविष्याची तरतूद टेन्शनची एक ना अनेक कारणं असतात. धकाधकीच्या जीवनात खळाळतं हास्य कुठेतरी हरवत चाललंय. तुमच्या याच समस्येवर हास्याचं औषध घेऊन येतोय ‘स्टार प्रवाह’चा नवा शो ‘एक टप्पा आऊट’.

कार्यक्रमाचं नाव जितकं हटके आहे तितकीच हटके या शोची संकल्पना आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून अस्सल विनोदवीरांचा शोध या कार्यक्रमातून घेतला जाणार आहे. महाराष्ट्रात दडलेल्या या हिऱ्यांना पैलू पाडण्याचं काम करणार आहेत कॉमेडीचा बादशाहा जॉनी लीवर आणि मराठीतले दोन दिग्गज कलाकार करणार आहेत.

या अनोख्या कार्यक्रमाविषयी सांगताना जॉनी लीवर म्हणाले, ‘ह्युमर आहे म्हणूनच त्या जागी जज म्हणून जॉनी लीवर आहे. ‘स्टार प्रवाह’ वाहिनीने ‘एक टप्पा आऊट’च्या निमित्ताने नव्या टॅलेण्टसाठी खूप मोठं व्यासपीठ उपलब्ध करुन दिलं आहे. या अनोख्या संधीचा लाभ सर्वांनीच घ्यायला हवा.‘एक टप्पा आऊट’मध्ये माझा सहभाग आहे याचा एक महाराष्ट्रीयन म्हणून मला अभिमान आहे.’

Loading...

एक टप्पा आऊट’मध्ये जॉनी लिवर यांच्यासोबत विनोदाचे दोन हुकमी एक्के जजच्या भूमिकेत दिसतील. हे दोन विनोदवीर कोण असतील याची उत्सुकता आहे.

‘सध्या जगाला हसण्याची आणि हसवण्याची गरज आहे. यासाठीच स्टार प्रवाह वाहिनी ‘एक टप्पा आऊट’ हा अनोखा स्टॅण्ड अप कॉमेडी शो घेऊन येत आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात दडलेल्या टॅलेण्टचा शोध या कार्यक्रमातून घेतला जाईल.  दिग्गज परीक्षक आणि सुप्रसिद्ध कलाकार मंडळींच्यासानिध्यात नवख्या कलाकारांना मार्गदर्शन केलं जाईल. मनोरंजनाने परिपूर्ण असा हा कार्यक्रम असेल’ अशी भावना ‘स्टार प्रवाह’चे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे यांनी व्यक्त केली.

‘सध्या जगाला हसण्याची आणि हसवण्याची गरज आहे. यासाठीच स्टार प्रवाह वाहिनी ‘एक टप्पा आऊट’ हा अनोखा स्टॅण्ड अप कॉमेडी शो घेऊन येत आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात दडलेल्या टॅलेण्टचा शोध या कार्यक्रमातून घेतला जाईल.
दिग्गज परीक्षक आणि सुप्रसिद्ध कलाकार मंडळींच्यासानिध्यात नवख्या कलाकारांना मार्गदर्शन केलं जाईल. मनोरंजनाने परिपूर्ण असा हा कार्यक्रम असेल’ अशी भावना ‘स्टार प्रवाह’चे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे यांनी व्यक्त केली.

३ मार्चपासून ‘एक टप्पा आऊट’ च्या ऑडिशन्सना सुरुवात होणार आहे. मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर आणि रत्नागिरी येथे या ऑडिशन्स पार पडणार आहेत. या ऑडिशनबद्दलची माहिती लवकरच ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरुन देण्यात येईल. तेव्हा मनोरंजनाची ही धमाल सफर अनुभवण्यासाठी सज्ज व्हा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 20, 2019 06:19 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...