प्रमोद सौन्दडे आणि संदीप राजगोळकर, प्रतिनिधी
बेळगाव, 01 नोव्हेंबर : 1 नोव्हेंबरच्या कर्नाटक स्थापना दिनाच्या निषेधार्थ मराठी भाषिकांनी काढलेल्या मूकमोर्चावर लाठीचार करण्याची मर्दुमकी कानडी पोलिसांनी गाजवली आहे. सीमावासीयांची दडपशाही करणाऱ्या कानडी सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त होतोय.
बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीचा सीमावर्ती भाग म्हणजे महाराष्ट्राच्या माथ्यावरची भळभळती जखम आहे. कारण नेहमीप्रमाणे आजही कानडी अत्याचारापुढे मराठी आवाज घोटण्याचा प्रयत्न झाला.
1 नोव्हेंबरच्या कर्नाटकच्या स्थापना दिनाच्या निषेधार्थ मराठी भाषिकांनी मूकमोर्चा काढला. मात्र कर्नाटकी पोलिसांनी अत्यंत बेदरकारपणे मोर्चावर लाठीचार्ज केला.
VIDEO: नगरसेविकेचा स्टंट, आंदोलनासाठी चढली थेट दिव्याच्या खांबावर
महाराष्ट्र-कर्नाटक वादाचा इतिहास (H)
- 1 मे 1960 रोजी द्वैभाषिक मुंबईचं विभाजन करुन महाराष्ट्र आणि गुजरात ही राज्यं अस्तित्वात
- मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना
- बेळगाव,कारवार, निपाणी, बिदर, भालकी वगळून
महाराष्ट्राची निर्मिती
- हा मराठी भाषिक प्रांत महाराष्ट्रात समावेश करण्याची
मागणी आजही कायम
- याच कारणानं महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद आजही धगधगता
1960 पासून सीमावर्ती भागातील मराठी भाषिक महाराष्ट्रात येण्यासाठी झगडतो आहे. मात्र राजकीय इच्छाशक्तीपुढे मराठा आवाज क्षीण ठरतोय. महाराष्ट्राची दुखरी जखम कुरडण्यासाठी कर्नाटकनं बेळगावला उपराजधानीचा दर्जा बहाल झाला. इथंच हिवाळी अधिवेशनही भरवलं जातं.
त्यामुळे संयुक्त महाराष्ट्रासाठी रक्त सांडणाऱ्या हुतात्म्यांच्या बलिदानाचं खरं चीज कधी होणार? याचं उत्तर सध्या तरी कुणाकडेच नाही आहे.
VIDEO : शिर्डी साई संस्थानात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा धुडगूस!