मुंबईतून मराठी माणूस हद्दपार, मध्य रेल्वेचा धक्कादायक खुलासा

महाराष्ट्राची राजधानी मुंबई शहरातून मराठी माणसावर हद्दपार होण्याची वेळ आली आहे. रेल्वेच्या प्रवासी संख्येतून हे धक्कादयक वास्तव समोर आलं आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 21, 2019 11:07 PM IST

मुंबईतून मराठी माणूस हद्दपार, मध्य रेल्वेचा धक्कादायक खुलासा

विनय म्हात्रे, प्रतिनिधी

मुंबई, 21 जून : ऐकेकाळी मुंबईत मराठी भाषिकांची संख्या लक्षणीय होती. मात्र, गेल्या काही वर्षात मुंबईतील मराठी माणूस मुंबई बाहेर फेकला गेला असल्याचं चित्र आहे. मुंबईत वाढत्या घरांच्या किंमती सामान्य मुंबईकरांच्या आवाक्या बाहेर गेल्यात आणि त्यामुळेच मराठी माणसाला मुंबई बाहेर जाण्याची वेळ आली आहे. उपनगरातील आवाक्याबाहेर गेलेले जागांचे भाव, वाहतूक कोंडीमुळे होणारे प्रदूषण यामुळे मुंबईकरांनी शहराबाहेर कूच करण्यास सुरुवात केली आहे. नुकत्याच मध्य रेल्वेने जाहीर केलेल्या आकडेवारीवरून ही बाब समोर आली आहे.

महाराष्ट्राची राजधानी मुंबई शहरातून मराठी माणसावर हद्दपार होण्याची वेळ आली आहे. रेल्वेच्या प्रवासी संख्येतून हे धक्कादयक वास्तव समोर आलं आहे. भायखळा, दादर, चिचंपोकळी, चुनाभट्टी, माटुंगा, सॅण्डहर्स्ट रोड आणि शिवडी या मराठी बहुल भागातील लोकल प्रवासी संख्येत सरासरी 1 टक्क्याने घट झाली आहे.

दुसरीकडे हार्बर मार्गावरील पनवेलसह खारघर, सीवूड्स, घणसोली, उलवे तसेच मध्य मार्गावरील बदलापूर, टिटवाळा आणि आसनगाव या उपनगरातील प्रवासी संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मुंबईत घरांच्या किंमती मराठी माणसांच्या आवाक्या बाहेर गेल्यामुळं त्यांनी उपनगरांची वाट धरली आहे. त्यामुळंचं गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी या परिसरातील लोकल प्रवाशांच्या संखेत झपाट्याने वाढ झाली आहे.

- पनवेलहुन रोज सरासरी 1 लाख 4 हजार प्रवासी प्रवास करतात

Loading...

- गेल्या वर्षीच्या तुलनेत 13 हजार 435 ने संखेत वाढ झाली आहे.

- घणसोली, खारघर स्थानकातून गतवर्षीच्या तुलनेत 12 ते 13%ने प्रवासी संख्येत वाढ झाली.

- टिटवाळा, बदलापूर, अंबरनाथ स्थानकात गेल्या वर्षीच्या तुलनेत 9 ते 10 %ची वाढ झाली.

मुंबईच्या विकासामध्ये अक्षम्य चुका झाल्याने त्याचा परिणामी लोकांना नाइलाजास्तव मुंबई सोडून जावं लागतं आहे अशी प्रतिक्रिया मराठी बिल्डर असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश बाविस्कर यांनी दिली आहे. तर मुंबईतील जागांचे दर आणि नवी मुंबई, बदलापूर पट्ट्यातील घराच्या दारात मोठी तफावत असल्यामुळे मुंबईकरांचे आकर्षण ठरताहेत असंही मत बाविस्करांनी व्यक्त केलं.

नव्याने विकसित झालेल्या या उपनगरांमधील घरांच्या किंमती मुंबईच्या तुलनेतचं कमी असल्यामुळं या भागाकडं सामान्य मुंबईकरांचा ओढा वाढतो आहे.  येत्या पाच वर्षात राज्य सरकारही याच भागात निवासी प्रकल्प उभारणार असल्यामुळं सामान्य मुंबईकरांची भागांना पसंती मिळत आहे.

VIDEO : बिचुकले पुन्हा जाणार का बिग बाॅसच्या घरात? सई आणि मेघाचा खुलासा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: mumbai
First Published: Jun 21, 2019 11:07 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...