तामीळनाडूत मराठी मनाची श्रीमंती,शिवजयंती उत्सवात रुग्णाला मदत

तामीळनाडूत मराठी मनाची श्रीमंती,शिवजयंती उत्सवात रुग्णाला मदत

शिवजयंतीच्या निमित्ताने आयोजित एका कार्यक्रमात मध्यंतरामध्ये एका मातेने आपल्या मुलाच्या आॅपरेशनच्या खर्चासाठी मदतीसाठी आवाहन केलं. आणि...

  • Share this:

मंगेश चिवटे, 29 मार्च : तामीळनाडूतील वेल्लोरमध्ये मराठी भाषिक बांधवाच्या मनाच्या श्रीमंतीचे एक आदर्श उदाहरण पाहायला मिळालं आहे. शिवजयंतीच्या निमित्ताने आयोजित एका कार्यक्रमात मध्यंतरामध्ये एका मातेने आपल्या मुलाच्या आॅपरेशनच्या खर्चासाठी मदतीसाठी आवाहन केलं. आणि आश्चर्य म्हणजे एका तासात सुमारे साडे तीन लाखांची मदत गोळा झाली.

तामिळनाडूतील वेल्लोरमधील सी एम सी हाॅस्पिटल म्हणजे थॅलेसिमिया या रोगावरील बोन मॅरो ट्रान्सल्पँटसाठी अखेरची आशा. देशभरातील तसेच महाराष्ट्रातील अनेक थॅलेसिमिया ग्रस्त रुग्ण याच आशेने वेल्लोर गाठतात. महाराष्ट्रातील वाशीम जिल्ह्यातील एका मातेने आपल्या 10 वर्षांच्या थॅलेसिमियाग्रस्त मुलाच्या उपचारासाठी हे शहर गाठलं. यासाठी आपली आयुष्यभराची पुंजी विकून या मातेने 12 लाख रुपये हाॅस्पिटलमध्ये जमा केले. पण राहिलेल्या अडीच लाखांसाठी हाॅस्पिटलने आॅपरेशन सुरू करण्यास नकार दिला.

याच दरम्यान मराठी भाषिकांनी शिवजयंतीच्या निमित्ताने मेळावा ठेवला असल्याची माहिती या मातेला मिळाली. या कार्यक्रमात या मातेने मुलाच्या उपचारासाठी कमी पडणाऱ्या अडीच लाख रुपयांसाठी जाहीर याचना केली. आणि आश्चर्य म्हणजे एका तासात गलाई बांधवांनी साडेतीन लाखांची थैली सुपुर्द केली.

या शिवजयंती सोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या आमदार बच्चु कडू यांनी गलाई बांधवांच्या मनाची ही श्रीमंती पाहून आपण भारावून गेलो असल्याची प्रतिक्रिया दिली.

तर इतिहासकार डाॅ. शिवरत्न शेटे यांनी समाजातील गोरगरिबांना मदत करणा-या तामिळनाडूच्या या शिवजयंतीचा आदर्श महाराष्ट्राने घेण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केलं.

Loading...

महाराष्ट्रापासून आपल्या मातृभूमीपासून पासून हजारो किलोमीटर दूर गेला असला मराठी माणूस आपलं मराठीपण आणि आपली संस्कृती कायम जतन करण्याचा प्रयत्न करतो. गलाई बांधवांनी हे या मदतीतून सिध्द केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 29, 2017 09:51 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...