Elec-widget

जितेंद्र आव्हाडांविरोधात शिवसेना मराठमोळ्या अभिनेत्रीला देणार तिकीट, आज भरणार अर्ज

जितेंद्र आव्हाडांविरोधात शिवसेना मराठमोळ्या अभिनेत्रीला देणार तिकीट, आज भरणार अर्ज

रात्री उशीरा दिपाली सय्यदच्या नावाची घोषणा करण्यात आली. त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांना शिवसेनेचे तगडे आव्हान असणार आहे.

  • Share this:

मुंबई, 3 ऑक्टोबर: अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी शिनसेनेत पक्ष प्रवेश केला आहे. मातोश्रीवर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी हातावर शिवबंधन बांधून शिवसेनेत पक्ष प्रवेश केला. तसेच आज मुंब्रा विधानसभा मतदारसंघातून शिवसेना उमेदवार म्हणून अर्ज दाखल करणार आहेत. दिपाली सय्यद ही मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर रिंगणात उतरणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड रिंगणात आहे. त्यामुळे दिपाली सय्यद आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात लढत रंगणार आहे.

शिवसेनेचे मुस्लिम सेलिब्रिटी मराठी कार्ड

कळवा मुंब्रातून अभिनेत्री दिपाली सय्यदला उमेदवारी देऊन शिवसेना 'मुस्लिमसेलिब्रिटीमराठी कार्ड' वापरणार आहे. रात्री उशीरा दिपाली सय्यदच्या नावाची घोषणा करण्यात आली. त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांना शिवसेनेचे तगडे आव्हान असणार आहे.

या भाजपच्या खासदाराशी घेतला होता पंगा...

भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी साकळाई पाणी योजनेसंदर्भात माझ्याबाबत केलेले वक्तव्य चुकीचे असून त्यांनी त्याबाबात माफी मागावी अन्यथा आपण महिला आयोगाकडे तक्रार करणार असल्याचा इशारा साकळाई पाणी योजना कृती समितीच्या अध्यक्षा अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी दिला होता.

Loading...

इतर बातम्या - दररोज लग्नाचा ड्रेसच घालते ही महिला, कारण ऐकून तुम्हीही कराल कौतुक!

'देखणा माणूस आला तर त्याला पाहायला जायला पाहिजे', या आशयाचे वक्तव्य साकळाई पाणी योजनेबाबत खासदार सुजय विखे पाटील यांनी गुंडेगाव (ता. नगर) येथे काही दिवसांपूर्वी झालेल्या एका कार्यक्रमात केले होते. त्याला सय्यद यांनी आक्षेप घेतला होता. नगर येथे पत्रकार परिषद बोलावून सय्यद यांनी डॉ.विखे यांचा समाचार घेतला होता. त्या म्हणाल्या होत्या की, डॉ.विखे यांचे वक्तव्य मला पटलेले नाही. कारण सुजय डॉक्टर असून सुजाण नागरिक आहेत. ते खासदार असून त्यांच्या घराण्याचे संस्कारसुद्धा त्यांच्यावर आहेत. एक व्यक्ती म्हणून त्यांनी असे वक्तव्य करणे योग्य नाही. याबाबत त्यांनी माफी मागितली नाही, तर महिला आयोगाकडे मी तक्रार करणार आहे’, असे त्यांनी स्पष्ट केले.

इतर बातम्या - 'विसरण्याचा अधिकार' माहितीय का? जाणून घ्या कोणाला होऊ शकतो फायदा

मागितला होता पाठिंबा..

'मला बहीण मानले आणि लोकसभा निवडणुकीच्या वेळी सुजय विखे यांनी माझ्याकडे पाठिंबा मागितला होता, त्यांना मी पाठिंबाही दिला होता; मात्र, विखे यांचे ‘साकळाई’चे श्रेय घेण्यासाठी त्यांनी केलेलं वक्तव्य हे महिलांचा अपमान करणारं आहे. विखे यांनी या वक्तव्याबाबत माफी मागणं गरजेचं आहे. अन्यथा, महिला आयोगाकडे तक्रार करावी लागेल’, असंही त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, स्थानिक नेते असेच वागत राहिले तर श्रीगोंदा मतदारसंघातून कृती समितीचा उमेदवार उभा करीन, असेही सय्यद यांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 4, 2019 07:30 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...