मुंबई, 7 डिसेंबर- 'मन उडू उडू झालं' या मालिकेतील दिपू म्हणजेच अभिनेत्री ऋता दुर्गुळे ( hruta durgule) तरुणांच्या गळ्यातील ताईत बनली आहे. तिचा चाहता वर्गही मोठा आहे. सोशल मीडियावर ऋताचे अनेक फॅन पेजेस आहेत, अनेक ग्रुप आहेत. ऋतानं सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. नुकतीच तिनं सोशल मीडियावरून प्रेमाची कबुली दिली आहे. काही दिवसांपूर्वी ऋताने प्रतीकसोबतच्या नात्याचा खुलासा करत त्यांचा फोटो शेयर केला होता. आता ऋताच्या एका नव्या पोस्टमुळे तिच्या लग्नाची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.
सोशल मिडीयावर ऋता आणि प्रतीक या कपलची जोरदार चर्चा सुरु असतानाच ऋताची आणखी एक पोस्ट सध्या चर्चेत आहे. या पोस्टमध्ये ऋताने काहीतरी वेगळं सुचीत केल्याचं दिसतय. #18daystogo म्हणजेच 18 दिवस बाकी असं तिनं तिच्या इन्स्टा स्टोरीला दोघांचा फोटो शेअर करत म्हटलं आहे. आता नेमके हे 18 दिवस कशासाठी ? ऋता साखरपुडा करतेय की लग्न करतेय ? असा प्रश्न आता तिच्या चाहत्यांना पडला आहे. त्यामुळे लवकरच ऋता आणि प्रतीक लग्न करणार असल्याच्या चर्चा सध्या सुरु आहेत. तेव्हा नेमके हे 18 दिवस कशासाठी हे कदाचीत 18 दिवसांनंतर समजणार आहे.
मास मीडिया या पदवी अभ्यासक्रमातील जाहिरात क्षेत्रात शिक्षण घेतलेली अभिनेत्री ऋता दुर्गुळे हिच्या 'दुर्वा' या मालिकेतून सर्वांसमोर आली. या मालिकेनं जवळपास हजार भागांचा टप्पा पूर्ण केला होता. त्यानंतर ती 'फुलपाखरू' मालिकेत ती मुख्य भूमिकेत होती. तिची क्रेज पाहता मराठी अभिनेत्रींमध्ये सोशल मीडियावर सर्वात जास्त लोकप्रिय असलेली अभिनेत्री म्हणून तिच्याकडे पाहिलं जातं. सध्या ती मन उडू उडू झालं या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
प्रतीक हा हिंदी मालिकांचं दिग्दर्शन करत असून त्याने आत्तापर्यंत गाजलेल्या मालिकांचे दिग्दर्शन केलय. शिवाय तो अभिनेत्री मुग्धा शाह यांचा मुलगा आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.