मुंबई, 08 आॅगस्ट : गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी मराठा समाज रस्त्यावर उतरलाय. राज्यभरात ठिकठिकाणी हिंसक आंदोलन करण्यात आली. आता मराठा आरक्षणासाठी 9 आॅगस्ट रोजी बंद पुकारण्यात आलाय. मात्र या बंदमधून मुंबई, ठाणे, नाशिक आणि धुळे वगळता राज्यभर बंद पुकारण्यात आलाय. या शहरात बंद नसला तरी शांततेत ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. या बंद दरम्यान शाळा, महाविद्यालय बंद नसणार असल्याची घोषणा राज्य सरकारने केलीये.
औरंगाबाद येथे मराठा क्रांती महामोर्चाची पत्रकार परिषद पार पडली. मराठा समाजाची राज्यव्यापी बंदसंदर्भात बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत महाराष्ट्रासह मुंबईत बंद पुकारण्यात आलाय. शांततेनं हा बंद पुकारण्यात येईल, हा बंद कुठल्या जाती धर्माच्या विरोधात नाही तर न्याय हक्कासाठी आहे. सगळ्या समाजाच्या लोकांनी सहकार्य करावे असं आवाहन आयोजकांनी केलंय. सकाळी ८ ते सायंकाळी ६ पर्यंत हा बंद असेल. बंदमधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत. कुठल्याही शासकीय/ खासगी मालमत्तेचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी अशी सुचना करण्यात आलीये. तसंच तरुणांनी आत्महत्या न करण्याचे मराठा क्रांती महामोर्चाचे जाहीर आवाहन केलंय. जातीय सलोखा बिघडू नये म्हणून नवी मुंबईत बंद पाळण्यात येणार नाही.
या ठिकाणी असेल पूर्ण बंद
अहमदनगर
हिंगोली
सोलापूर
वाशिम
परभणी
सातारा
कोल्हापूर
सांगली
औरंगाबाद
बंद नसेल मात्र शांततेत आंदोलन असणार
मुंबई
नवी मुंबई
ठाणे
नाशिक
धुळे
ठाण्यात बंद नाही
9 ऑगस्टला ठाणे जिल्ह्यात बंद पाळण्यात येणार नाही. फक्त बलीदान दिलेल्यांना श्रद्धांजली दिली जाणार आहे. समाजातील तणाव वाढू नये म्हणून हा निर्णय सर्वानुमते 7 ऑगस्ट रोजी झालेल्या सकल मराठा समाजाच्या बैठकीत झाला आहे. आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या 21 हुतात्म्यांना सकाळी 10 ते 11 वाजता या वेळात श्रद्धांजली वाहून सरकारचा जाहीर निषेध करण्यासाठी शहरातील सहा ठिकाणी मूक श्रद्धांजली होईल. या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचा मोर्चा, रॅली, रास्तारोको अथवा घोषणाबाजी होणार नाही.
श्रद्धांजलीची ठिकाणे
1) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर (रेस्ट हाऊस)
2) अष्टविनायक चौक, कोपरी
3) कळवा नाका
4) वर्तकनगर नाका
5) वागळे प्रभाग समिती
6) सूरज वॉटरपार्क, वाघबीळ, मराठा क्रांती मोर्चा, समन्वय समिती सकल मराठा समाज
दरम्यान, मराठा आरक्षणाबाबत मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली. या सुनावणी दरम्यान १५ नोव्हेंबरपर्यंत मागासवर्गीय आयोग आपला अहवाल राज्य सरकारला देणार असल्याची माहिती सरकारकडून देण्यात आलीये. तसंच मराठा आरक्षणासाठी 5 संस्थांना काम देण्यात आलं असून लवकरात लवकर काम करण्याचे आदेश हायकोर्टाने राज्य सरकारला दिले आहे.
हेही वाचा
मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात बळीराजाची फसवणूक; परस्पर काढलं शंभर कोटींचं कर्ज
VIDEO : ठाण्यात फिरतोय विचित्र 'पिनमॅन', मुलांना का टोचतोय टाचण्या?