S M L

मराठा आरक्षणाची 'प्रगती', मागासवर्गीय आयोगाने सादर केला पहिला अहवाल

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आज मुंबई उच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे.

Updated On: Sep 11, 2018 12:45 PM IST

मराठा आरक्षणाची 'प्रगती', मागासवर्गीय आयोगाने सादर केला पहिला अहवाल

मुंबई, 11 सप्टेंबर : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आज मुंबई उच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. मराठा आरक्षणासंदर्भात मागास प्रवर्ग आयोगाचा पहिला प्रगती अहवाल आज हायकोर्टात सादर झाला आणि त्यानुसार आता 15 नोव्हेंबरपर्यंत आयोग आपला अंतिम प्रगती अहवाल सादर करावा लागणार आहे. त्यामुळे आता लवकरच हा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागणार यात शंकाच नाही.

मराठा आरक्षणाची सद्यस्थिती काय याबाबतचा अहवाल दर 15 दिवसांनी कोर्टात सादर करणे बंधनकारक आहे. त्यानुसार आज मागास आयोगाने आपला प्रगती अहवाल मुंबई उच्च न्यायालयात दाखल केला होता. तर यात सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक चार आठवड्यांनी कामकाजाचा प्रगती अहवाल सादर करण्याचे निर्देश हायकोर्टाकडून देण्यात आले आहे.

यात मराठा आरक्षणाच्या प्रगती अहवालासाठी किती लोकांशी चर्चा केली, किती लोकांचे मत नोंदवले, आरक्षणाच्या मुद्द्याच्या प्रत्येक कामाची यादी दर चार आठवड्याने सादर करण्याचं उच्च न्यायालयाने म्हटलं आहे. त्यामुळे ही मराठा आरक्षणासंदर्भातली सगळ्यात महत्त्वाची प्रगती आहे.

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या प्रगती अहवालाला कालमर्यादा असावी यासंदर्भात विनोद पाटील यांनी आयोगाकडे याचिका दाखल केली होती. त्यावर 15 नोव्हेंबरपर्यंत आयोग आपला मराठा आरक्षणाचा अंतिम अहवाल सादर करणार आहे.

तर आज मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक उद्धव ठाकरेंना भेटणार आहेत. मराठा संघटनांनी मोर्चा काढल्यानंतर पहिल्यांदाच ते उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत. याआधी मराठा क्रांती मोर्चाचे लोक नारायण राणेंच्या मध्यस्तीनं मुख्यमंत्र्यांना भेटले होते. ते आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत. त्यामुळे या भेटीदरम्यान काय चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 11, 2018 12:45 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close