मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची शिफारस, वाद वाढणार?

मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची शिफारस, वाद वाढणार?

घटनेनुसार फक्त मागासवर्गांनाच आरक्षणाची तरतूद आहे. मागासवर्गाने आता मराठा समाज मागास असल्याची शिफारस केली आहे. मात्र ही शिफारस कोर्टात टिकणार का हा खरा प्रश्न आहे.

  • Share this:

मुंबई, ता.16 नोव्हेंबर : मराठा समाजाला ओबीसींच्या कोट्यातूनच आरक्षण देण्याची शिफारस मागासवर्ग आयोगानं केली आहे अशी माहिती या आयोगाचे सदस्य डॉ. राजेश करपे यांनी दिलीय. तर असं आरक्षण द्यायला ओबीसी नेते आणि संघटनांचा तीव्र विरोध आहे. त्यामुळं सरकार समोर नवा पेच निर्माण होणार आहे.

घटनेत SC/ST आणि OBC याच प्रवर्गातून आरक्षण द्यावे अशी तरतूद आहे त्यामुळे मराठयांनाही ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण देता येतं आणि तस आरक्षण दिलं तरच ते टिकेल. मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण दिल्यानंतरही ओबीसीच्या आधीच्या आरक्षणाला धक्का पोहचणार नाही असाही खुलासाही डॉ.करपे यांनी न्यूज18 लोकमतशी बोलताना केला.

महाराष्ट्रात आरक्षणाची मर्यादा ही 52 टक्के आहे. त्यात अनुसूचित जाती व जमातींसाठी 20 टक्के, भटके-विमुक्तांसाठी 11 टक्के, ओ.बी.सी.ना 19 टक्के तर विशेष मागास प्रवर्गाला दोन टक्के आरक्षण दिलं जातं. त्यामुळं यात मराठा समाजाला नेमकं कसं सामावून घेणार असा प्रश्न आता निर्माण होतोय.

घटनेनुसार फक्त मागासवर्गांनाच आरक्षणाची तरतूद आहे. मागासवर्गाने आता मराठा समाज मागास असल्याची शिफारस केली आहे. मात्र ही शिफारस कोर्टात टिकणार का हा खरा प्रश्न आहे. ओ.बी.सींच्या आरक्षणाची तरतूद वाढवावी आणि त्यात मराठ्यांना वाटा द्यावा अशी मागही काही मराठा संघटनांनी केली आहे.

तर ओ.बी.सींच्या कोट्यातून आरक्षण दिलं तर त्याचा फटका ओबीसींना बसू शकतो त्यामुळं या प्रश्नावरही आता राजकारण पेटण्याची शक्यता आहे. तामिळनाडूत 69 टक्के आरक्षण दिलं जातं त्याच धर्तीवर तरतूद करून महाराष्ट्रातही आरक्षणाचा पॅटर्न राबवण्याचा राज्य सरकार विचार करतेय.

VIDEO : मुंब्रा रेल्वे स्टेशनबाहेर रिक्षात सीएनजी गॅसचा स्फोट

First published: November 16, 2018, 7:25 PM IST

ताज्या बातम्या