मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

मराठा समाजाला धक्का, शिंदे सरकारचा फैसला लांबणीवर, कोरोनानंतर स्वाईन फ्लूचा कहर TOP बातम्या

मराठा समाजाला धक्का, शिंदे सरकारचा फैसला लांबणीवर, कोरोनानंतर स्वाईन फ्लूचा कहर TOP बातम्या

Today News : राज्यासह देशविदेशातील महत्त्वाच्या घडामोडी अगदी काही मिनिटांत जाणून घ्या.

Today News : राज्यासह देशविदेशातील महत्त्वाच्या घडामोडी अगदी काही मिनिटांत जाणून घ्या.

Today News : राज्यासह देशविदेशातील महत्त्वाच्या घडामोडी अगदी काही मिनिटांत जाणून घ्या.

  • Published by:  Rahul Punde
मुंबई, 30 जुलै : राज्यात अतिवृष्टीने मोठं नुकसान झालं आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमँत्री यांच्या दौऱ्यानंतर आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील नुकसानग्रस्त भागाचा दौरा केला. तरीही अद्याप शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही. दुसरीकडे अजून मंत्रिमंडळ विस्तार झालेला नसल्याने विरोधकही टीका करत आहे. दरम्यान, मुंबईतील एका कार्यक्रमात राज्यापाल कोश्यारी यांनी टीका केली आहे. उच्च न्यायालयाच्या एका निर्णयामुळे मराठा समाजाला मोठा धक्का बसला आहे. देशविदेशातील महत्त्वाच्या घडामोडी काही मिनिटांत वाचा. राज्यपालांचे वादग्रस्त विधान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या काही वक्तव्यामुळे राज्यात वाद निर्माण झाला आहे. अशातच आता पुन्हा एकदा राज्यपाल कोश्यारी यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. बोगस प्रमाणपत्र दाखवत सरकारी नोकरी लाटणाऱ्या 109 जणांना दणका खेळाडूंना शासकीय नोकरीत सामावून घेण्याची राज्य सरकारची एक योजना आहे. राज्य सरकारकडून राज्यभरातील अनेक खेळाडूंना दरवर्षी त्यांच्या कर्तृत्वाच्या जोरावर शासकीय नोकरीत सामील केलं जातं. पण काही खेळाडू याच गोष्टीचा गैरफायदा घेत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. मराठा समाजाला मोठा धक्का अद्याप मराठा आरक्षाचा प्रश्न मार्गी न लागल्यामुळे राज्यातील मराठा समाजाच्या तरुणांना SEBC प्रवर्गातून लागू करण्यात आलेले आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजेच EWS आरक्षणाचा लाभदेखील रद्द करण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी याबाबत निर्णय दिला. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. एकनाथ शिंदे सरकारचा फैसला पुन्हा लांबणीवर जाणार? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदारांवर अपात्रेच्या कारवाईच्या मागणीवरुन मुख्य शिवसेनेकडून करण्यात आलेल्या सर्व याचिकांवर 1 ऑगस्टला सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे, असं मानलं जात होतं. पण ही सुनावणी आता लांबणीवर जाण्याती शक्यता आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात स्वाईन फ्लूचा कहर राज्यात कोरोनासह आता स्वाईन फ्लू आणि डेंग्यूचाही धोका वाढतो आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जिल्ह्यालाही स्वाईन फ्लूने विळखा घातला आहे. गेल्या दिवसाची स्वाईन फ्लू रुग्णाची जी आकडेवारी समोर आलीये ती पाहून आरोग्य विभागही खडबडून जागे झाले आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लि करा. मंत्रिमंडळ विस्ताराला विलंब मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधील बरेच दिवस उलटले. मात्र, अद्यापही राज्यात मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. यादरम्यान वारंवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला जात आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारावरुन काहीतरी फिस्कटलं का? अशी चर्चा सध्या रंगलेली आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. भारताचा विंडीजवर विजय IND vs WI 1st T20 Live News in Marathi, 29 July 2022 : टीम इंडिया विरुद्ध वेस्ट इंडीज यांच्यातील पहिल्या टी 20 सामन्यात भारताचा धडाकेबाज विजय झाला आहे. भारताने तब्बल 68 धावांनी विंडीजवर विजय मिळवला आहे. टीम इंडिया विरुद्ध वेस्ट इंडीज यांच्यातील पाच सामन्यांच्या टी 20 मालिकेतील आजचा पहिला सामना होता. या पाच सामन्यांच्या मालिकेत भारताची विजयी सुरुवात झाली आहे. आजचा सामना हा तारौबायेथील ब्रायन लारा क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवण्यात आला. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.
First published:

Tags: Eknath Shinde, Maratha reservation, Swine flu in india

पुढील बातम्या