Maratha Reservation: मराठ्यांना आज तरी मिळणार का आरक्षण? वाचा महत्त्वाचे मुद्दे!

Maratha Reservation: मराठ्यांना आज तरी मिळणार का आरक्षण? वाचा महत्त्वाचे मुद्दे!

मराठा समाजाला मराठा आरक्षण मिळणार का यासंदर्भात उच्च न्यायालयात अंतिम निकाल होण्याची शक्यता आहे.

  • Share this:

मुंबई, 27 जून: मराठा समाजाला मराठा आरक्षण मिळणार का यासंदर्भात उच्च न्यायालयात अंतिम निकाल होण्याची शक्यता आहे. या आरक्षणासाठी मराठा समाजाने मुक मोर्चे काढले होते. या आरक्षणाच्या विरोधात आणि समर्थनात करण्यात आलेल्या जनहित याचिकांवर उच्च न्यायालयान एकत्र सुनावणी करण्यात आली होती. त्यावर आज निर्णय अपेक्षित आहे.

काय आहेत मराठा समाजाच्या मागण्या आणि महत्त्वाचे मुद्दे

> मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण

> शिक्षण आणि नोकरी क्षेत्रात आरक्षण

> अधिसुचनेनुसार केवळ उन्नत आणि प्रगत गटाखालील व्यक्तींना आरक्षणाचा लाभ मिळणार

> ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण

> विशेष प्रवर्ग बनवून मराठा समाजाला आरक्षण

> मागासवर्गीय आयोगाच्या अहवालात मराठा समाजाच्या आरक्षणाला हिरवा कंदील

> मराठा समाजातील राज्यातील संख्या 32 टक्के

> प्रशासकिय सेवेत मराठ्यांचे प्रमाण केवळ 6.92 टक्के

> मराठा समाजातील केवळ 4.30 टक्के उच्चशिक्षित

> मराठा समाजापैकी 76.86 टक्के शेतकरी वर्ग

VIDEO: विरोधकांच्या आरोपांना चंद्रकांत पाटील यांचं उत्तर

First published: June 27, 2019, 12:51 PM IST

ताज्या बातम्या